शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स ‘खान फॉर एज्यूकेटर्स’ सादर

51

पुणे : खान अकॅडमी इंडियाने आज भारतातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी नवीन खान फॉर एज्यूकेटर्स हा एक विनामूल्य ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केली. खान अकॅडमीचा वापर कसा करायचा आणि विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी मंचाचा फायदा कसा घ्यायचा याविषयी शिक्षकांसाठी या अभ्यासक्रमात माहितीपर व्हिडिओ आहेत. हा अभ्यासक्रम त्यांना प्रगत शैक्षणिक पद्धती म्हणजे प्रभुत्व-आधारित तसेच वैविध्यपूर्ण शिक्षणासह सक्षम करेल. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम इंग्रजी, हिंदी, पंजाबी मराठी या भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे आणि कोणत्याही शिक्षकाला खान अकॅडमीच्या संकेतस्थळावर भेट देऊन शिकता येईल.

Introducing 'Khan for Educators', a free online certification course for teachers

खान अकॅडमीने खान फॉर एज्युकेटर्स हा अभ्यासक्रम शिक्षकांकरिता त्यांच्या दैनंदिन अध्यापन पद्धती मध्ये खान अकॅडमी चा अंतर्भाव करण्‍यासाठी आणि ऑनलाईन साधन वापरण्‍याची आव्हाने कमी करण्‍याच्या दृष्टीने सक्षम करण्‍यासाठी तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गदर्शक त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेली शिक्षणविषयक अभ्यास प्रकरणं आहेत. जेणेकरून शिक्षकांना प्रभावीपणे मदत होऊ शकेल. या अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन बिझनेस टू बिझनेस (बी2बी) मार्केटप्लेस, इंडियामार्टच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती वासुदेवन यांनी सांगितले, “आम्ही कोठेही कोणालाही विनामूल्य जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या मिशनवर आहोत आणि जेव्हा आपण शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन तसेच खान फॉर एज्युकेटर्स कोर्स सारख्या शिक्षणाच्या संधींसह सक्षम करू केवळ तेव्हाच अपेक्षित ध्येय गाठता येईल. हा अभ्यासक्रम आता अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून शिक्षक त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिकू शकतील, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा विस्तार शक्य होईल. परिणामी विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा दिसू शकेल. आमच्या द्रष्टेपणाला पाठिंबा देऊन या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही इंडियामार्ट टीमचे आभार मानतो.”

भारतात, खान अकॅडमी अनेक राज्यांच्या सरकार समवेत काम करून सार्वजनिक तसेच सरकारी शाळांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मजकूर उपलब्ध करून देते आहे. जेणेकरून खासगी तसेच उपनगरांतील शाळांदरम्यान गुणवत्तापूर्ण शिक्षणातील दरी भरून निघेल. या प्रक्रियेत, खान अकॅडमी शिक्षकांना वैयक्तिक प्रशिक्षण देण्यासाठी, शिक्षकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी हेल्पडेस्क तयार करण्याच्या दृष्टीने आणि खान फॉर एज्युकेटर्स अभ्यासक्रमाद्वारे शिक्षकांसाठी त्यांच्या गतीनुसार शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा ऑनलाइन अभ्यासक्रम भारतात कुठेही शिक्षकांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांना त्यांच्या गतीने शिक्षण घेण्यात मदत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. शिक्षकांना आता त्यांच्या स्वत:च्या भाषेत (तीन प्रादेशिक भाषांपुरते मर्यादित) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अद्ययावत राहण्याच्या शिक्षकांच्या प्रयत्नांना पर्याय मिळाला आहे.

हेही वाचा :

अपस्टॉक्सतर्फे भारतीयांना त्यांच्या गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यात मदत करण्यासाठी ‘इन्व्हेस्ट राइट’ हे नवे कॅम्पेन