शाओमी इंडिया आणि वी यांची भागीदारी युजर्सना ५जी अनुभव प्रस्तुत करणार

60
Xiaomi India and Vi partner to offer 5G experiences to users

पुणे : देशातील आघाडीचा स्मार्टफोन ब्रँड शाओमी इंडियाने आपल्या ग्राहकांना अखंडित ५जी अनुभव प्रदान करण्यासाठी वोडाफोन आयडियासोबत (वी) भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे शाओमी आणि रेडमी स्मार्टफोन युजर्सना वी ५जी सेवा सुरु करण्यात आल्यानंतर प्रगत डेटा अनुभवाचे लाभ घेता येतील. शाओमी आणि रेडमीच्या १८ स्मार्टफोन्सच्या विशाल श्रेणीचे वी ५जीवर यशस्वीपणे परीक्षण करण्यात आले असून, एफओटीए अपडेट्सनंतर या स्मार्टफोन्सवर वी ५जी नेटवर्क उपलब्ध होईल. यासाठी ग्राहकांना वी ने ५जी नेटवर्कचे कमर्शियल लॉन्च केल्यानंतर, आपल्या प्रीफर्ड नेटवर्क सेटिंग्स ४जीच्या ऐवजी ५जी कराव्या लागतील.

१८ ५जी सक्षम शाओमी आणि रेडमी स्मार्टफोन्सच्या विशाल श्रेणीचे परीक्षण यशस्वीपणे करण्यात आले असून लॉन्चनंतर वी ५जी नेटवर्क या स्मार्टफोन्सवर उपलब्ध होईल

या ५जी सक्षम डिव्हायसेसमध्ये शाओमी १३ प्रो, रेडमी नोट १२ प्रो ५जी, रेडमी नोट १२ प्रो+ ५जी, रेडमी नोट १२ ५जी, शाओमी १२ प्रो, एमआय ११ अल्ट्रा, एमआय ११एक्स प्रो, शाओमी ११टी प्रो ५जी, शाओमी ११ लाईट एनई ५जी, रेडमी ११ प्राईम ५जी, रेडमी के५०आय, रेडमी नोट ११टी ५जी, रेडमी नोट ११ प्रो ५जी, एमआय ११एक्स, एमआय १०, एमआय १०टी, एमआय १०टी प्रो आणि एमआय १०आय यांचा समावेश आहे.

कनेक्टेड भविष्याच्या दिशेने वेगाने पुढे जाण्यासाठी आणि भारतामध्ये ५जी च्या अमर्याद क्षमतांचा लाभ घेण्यासाठी, शाओमी व वी एकत्र येऊन त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या डिव्हायसेसवर अनफिल्टर्ड ५जी नेटवर्क प्रदान करण्यासाठी सज्ज आहेत. शाओमी इंडिया आणि वीने सर्व शाओमी व रेडमी ५जी डिव्हायसेसवर नवी दिल्ली मध्ये नेटवर्कची व्यापक तपासणी यशस्वीपणे केली आहे.

Xiaomi India and Vi partner to offer 5G experiences to users

ग्राहक आणि व्यवसायांसाठी, भारतातील परिस्थिती व आवश्यकता यांना अनुसरून, ५जी युज केसेस विकसित करण्यासाठी वी टेक्नॉलॉजी लीडर्स, डोमेन एक्स्पर्ट, स्टार्ट-अप्स आणि डिव्हाईस ओईएमसोबत काम करत आहे.

देशभरातील सर्व स्तरातील ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञानाचे लाभ, सहज परवडण्याजोग्या किमतींमध्ये घेता यावेत यासाठी श्रेणीतील सर्वोत्तम तंत्रज्ञान अनुभव पुरवण्यासाठी शाओमी इंडिया बांधील आहे.