शाओमी इंडिया या देशातील आघाडीच्या स्मार्टफोन व स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने आज भारतातील त्यांच्या स्मार्टफोन श्रेणीसाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे स्वागत केले. नवोन्मेष्कारी व युजर-केंद्रित डिझाइनवर लक्ष केंद्रित करण्यासह शाओमीला भारतीय ग्राहकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळाली आहे. किफायतशीर किंमतीत उच्च दर्जाचे स्मार्टफोन्स देण्याप्रती ब्रॅण्डची कटिबद्धता दिसून आली आहे.
शाओमीचे ब्रॅण्ड तत्त्व सर्वांना किफायतशीर किंमतीत तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे आणि परिणामत: ब्रॅण्ड सतत देशातील सर्वात विश्वसनीय स्मार्टफोन ब्रॅण्ड ठरला आहे. सर्वोत्तम अभिनय कौशल्ये व संबंधित व्यक्तिमत्त्वासाठी प्रख्यात पंकज त्रिपाठी शाओमीची मुलभूत मूल्ये व तत्त्वाशी परिपूर्णरित्या सामावून जातात. वास्तविक सादरीकरण आणि प्रेक्षकांशी संलग्न होण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणाऱ्या त्यांच्यासोबतचा सहयोग शाओमीने ग्राहकांसोबत निर्माण केलेल्या नात्याला अधिक दृढ करेल.
साकारणाऱ्या प्रत्येक भूमिकेमध्ये अस्सलता आणण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणाऱ्या अभिनेत्याचे विनम्र आचरण आणि त्यांच्या विलक्षण भूमिकांच्या सादरीकरणाने देशभरातील अनेकांची मने जिंकली आहेत. आपल्या भूमिकांमध्ये वास्तविकता आणण्यासाठी प्रसिद्ध पंकज त्रिपाठीचे व्यक्तिमत्त्व ब्रॅण्डच्या मूल्यांशी परिपूर्णपणे संलग्न होते, ज्यामुळे ते ‘रेडमी का डबल भरोसा’ तत्त्वासाठी योग्य निवड आहेत.
शाओमी कुटुंबामध्ये पुरस्कार-प्राप्त अभिनेत्याचे स्वागत करत शाओमी इंडियाचे प्रमुख विपणन अधिकारी अनुज शर्मा म्हणाले, ‘‘आम्हाला शाओमी कुटुंबामधील नवीन सदस्य म्हणून पंकज त्रिपाठी यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. शाओमीमध्ये आम्ही वापरकर्त्यांना अपवादात्मक कार्यक्षमता व विनाव्यत्यय वापरासह सक्षम करण्याकरिता किफायतशीर किंमतीत सर्वोत्तम वैशिष्ट्ये देण्याप्रती नेहमी कटिबद्ध आहोत. पंकज त्रिपाठी हे आमच्या ब्रॅण्ड व्हिजनच्या साराशी संलग्न आहेत आणि प्रेक्षकांशी संलग्न होण्याची त्यांची क्षमता सर्वांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेला अधिक दृढ करण्यास साह्य करेल. आमचा विश्वास आहे की, शाओमी इंडियासोबत पंकज यांचा सहयोग आमच्या ब्रॅण्डला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि आम्ही या सहयोगाबाबत उत्सुक आहोत.’’
PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO
या सहयोगाबाबत आपले मत व्यक्त करत पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘‘शाओमी इंडियासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. या ब्रॅण्डला भारतीय ग्राहकांच्या गरजा माहित आहेत, तसेच त्यांना त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये पाहिजे असलेल्या सुविधांबाबत देखील माहित आहे. शाओमी इंडियाने देशातील एकूण तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहेत आणि मला नवोन्मेष्कार, दर्जा व किफायतशीरपणाशी संलग्न असलेल्या ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करताना आनंद होत आहे. मला ब्रॅण्डचे सर्वांसाठी नवोन्मेष्काराचे तत्त्व आवडते आणि मी या सहयोगासाठी उत्सुक आहे.’’
अपवादात्मक अनुभव देण्याचा प्रवास सुरू ठेवत आणि ग्राहकांच्या अपेक्षांच्या पलीकडे जात शाओमीने नाविन्यता आणण्यासोबत दर्जात्मक उत्पादन श्रेणी सादर करणे सुरू ठेवले आहे, जी ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांची पूर्तता करतात.
तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका