गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर १७७८ कुटुंबियांचा गृहप्रवेश
पुणे, २४ मार्च २०२३ : पुण्यातील आघाडीचा रिअल इस्टेट ब्रँड असलेल्या व 38 वर्षांचा वारसा असलेल्या व्हीटीपी रिअल्टी ने बाजारपेठेतील आपले नेतृत्व अधिक भक्कम केले आहे. बांधकाम,डिझाईन आणि सेवा या मुळ तत्त्वज्ञानाच्या भक्कम पायावर आधारित कंपनीने मार्च २०२३ अखेर संपत आलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी चौरस फूट बांधकाम हाती घेत त्यापैकी एकाच वर्षात ३६ लाख चौरस फूट जागा ग्राहकांना वितरीत केल्या आहेत.याचाच अर्थ एका वर्षात ग्राहकांना ४११७ घरे सुपूर्त केली आहेत.
याशिवाय गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कंपनीच्या ५ प्रकल्पांमध्ये १७७८ कुटुंबियांसाठी गृहप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठेत आणि कदाचित भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेत ही अद्वितीय कामगिरी आहे.
हे सर्व महत्त्वाचे टप्पे महसूलाचा विचार करता व्हीटीपी रिअल्टीचे स्थान गेली सलग 5 वर्षे आघाडीची कंपनी म्हणून अधोरेखित करतात. उत्कृष्टतता आणि अभिनवतेप्रती असलेल्या ब्रँडच्या कटिबध्दतेमुळे कंपनी अग्रस्थानी राहिली आहे.ग्राहककेंद्रित दृष्टीकोन,सर्व भागधारकांबरोबर दृढ भागीदारी,विकासासाठी योग्य ठिकाणांची निवड,अनुभवी व्यवस्थापन टीम आणि ग्राहकांप्रती वचनबध्दता यामुळे व्हीटीपी रिअल्टीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्हीटीपी रिअल्टी हा सिमेंट,बांधकाम साहित्य आणि अभियांत्रिकी सेवा अशा विविध व्यवसाय असलेल्या व्हीटीपी समुहाचा एक भाग आहे.यामुळे व्हीटीपी रिअल्टीला आपल्या संसाधनांचा आणि कौशल्याचा फायदा होत खर्चात बचत शक्य होते आणि त्याचबरोबर कामकाजातील कार्यक्षमता वाढते.
व्हीटीपी रिअल्टीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले की,या यशामागे कंपनीचे गुणवत्तेबद्दलची असलेली समर्पितता आणि ग्राहकांचे समाधान आहे आणि हीच आमची प्रेरक शक्ती आहे.आमच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे हजारो कुटुंबियांच्या जीवनात बदल घडवून आणता आला आणि आमची आतापर्यंतची सर्वांत मजबूत आर्थिक कामगिरी शक्य झाली.या आर्थिक वर्षाअखेर एकूण महसूल 4000 कोटी रूपयांचा टप्पा पार करेल.याशिवाय व्हीटीपी होम्स आणि व्हीटीपी लक्स या दोन नवीन संकल्पना सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.यामध्ये पुढील काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात बदल घडविण्याचे सामर्थ्य आहे.
व्हीटीपी होम्स आणि व्हीटीपी लक्स हे कंपनीचे आधुनिक प्रॉडक्टस ब्रँडस असून ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी याची रचना केली गेली आहे.याचे अनावरण नुकतेच करण्यात आले.व्हीटीपी होम्स हे उच्च आकांक्षा आणि अद्वितीय मुल्याची इच्छा असणार्या ग्राहकांसाठी आहे.यामध्ये विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रिमियम प्रॉपर्टीजचा समावेश आहे.
व्हीटीपी लक्स या ब्रँडचा उद्देश रिअल इस्टेट उद्योगात लक्झरी नव्याने परिभाषित करणे आहे.जे ग्राहक उत्कृष्टतता,कला-कुसर आणि तपशीलांकडे बारकाईने लक्ष केंद्रित करतात अशा ग्राहकांसाठी व्हीटीपी लक्स तर्फे जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा देण्यात येतात.शैली आणि विशिष्टतेवर (स्टाईल आणि एक्सक्लुझिव्हिटी) वर लक्ष केंद्रित करत व्हीटीपी लक्स नजिकच्या काळात रिअल इस्टेट बाजारपेठेत एक पथदर्शक ब्रँड बनण्यास सज्ज आहे.
व्हीटीपी रिअल्टी आणि त्याच्या नवीन योजनांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या.www.vtprealty.com.