पुणे, मार्च, २०२१: फिल्म, कम्युनिकेशन आणि सर्जनशील कलांचे आशिया खंडातील प्रमुख इन्स्टिट्यूट म्हणून ख्याती असलेल्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलने (डब्ल्यूडब्ल्यूआय)ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु होत असलेल्या वर्गांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेच्या दुसऱ्या फेरीच्या तारखांची घोषणा केली आहे.
व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलने फ्लिममेकिंग, ऍक्टिंग, ऍनिमेशन व गेम डिझाईन, मीडिया व कम्युनिकेशन, फॅशन डिझाईन, म्युझिक, व्हिज्युअल कम्युनिकेशन, डिझाईन व इव्हेन्टमॅनेजमेंट या विषयातील पूर्ण वेळ पदवी, पदव्युत्तर व डिप्लोमा कोर्सेससाठी चित्रपट व प्रसिद्धीमाध्यम क्षेत्रात उतरू पाहणाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणीकरण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२१ आहे. नोंदणीनंतर ०६ ते ०८ एप्रिल २०२१ या कालावधीत प्रवेश परीक्षा होईल.
ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म्स भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी कृपया येथे संपर्क साधावा – www.whistlingwoods.net किंवा प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज याठिकाणी पाठवावेत –admissions@whistlingwoods.net