व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन एमआयटी-एडीटीच्या विद्यार्थ्यांची पंढरपूरला निघाली सायकल वारी

36

पुणे, १० जून २०२३ : दर्जेदार शिक्षणासह विद्यार्थ्यांसाठी विविध विधायक उपक्रम राबवण्याऱ्या एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या २० विद्यार्थ्यांची एक सायकलवारी आज पंढरपूरकडे रवाना झाली. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती अभियानाला आणखी मजबूत करण्यासाठी एमआयटी-एडीटीच्या कॅम्पसमधून हिरवा झेंडा दाखवून रॅली रवाना करण्यात आली. रोईंग खेळाचे राष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थी सायकलने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. ही रॅली दररोज २०० किलोमीटर अंतर पार करणार आहे.

रॅलीला निरोप देते वेळी एमआयटी-एडीटीचे स्पोर्ट्स संचालक तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेता पद्माकर फड, स्टुडंट अफेयरचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डाॅ. सुराज भोयर, संगणक शास्त्र विभागाचे डाॅ. गणेश पाठक, प्रा. मधुकर निंबाळकर यांच्यासह एमआयटी-एडीटीचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या वर्षभरात काढण्यात आलेली ही दुसरी सायकल रॅली आहे.

 

MIT-ADT University Logo

या सायकल रॅलीला एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड यांनी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की, एमआयटी-एडीटी सातत्याने व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असते व भविष्यातही करीत राहणार. तोच संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय शासनाचे व्यसनमुक्तीचे जे अभियान आहेत, त्याला आणखी मजबूत करण्याचे काम आमचे विद्यापीठ करेल.

 

प्रा. सुराज भोयर यांनी या वेळी बोलताना सर्व युवा पिढीने विविध प्रकारच्या खेळांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवावे, तसेच कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहावे.