वी बिझनेसने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वृद्धिंगत होण्यात मदत करण्यासाठी सुरु केले #ReadyForNext 2.0 (रेडीफॉरनेक्स्ट २.०)

33

वी बिझनेसच्या ‘अनलॉकिंग एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स स्टडी’ २०२३ ची ठळक वैशिष्ट्ये :

· सर्वच उद्योगक्षेत्रांमध्ये फक्त ५५ ते ६०% एमएसएमई डिजिटलदृष्ट्या परिपक्व असल्याचे आढळून आले असून एमएसएमईंचे डिजिटलायझेशन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

· लॉजिस्टिक्स, मीडिया, उत्पादन या एमएसएमई सेक्टर्सचा डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स उच्च असून रिटेल, शिक्षण आणि हॉस्पिटॅलिटी यांचा डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स कमी आहे.

· एमएसएमईंना डिजिटलदृष्ट्या अधिक परिपक्व होण्यात मदत करत असलेले तंत्रज्ञान घटक सहयोग व उत्पादनक्षमता, सुरक्षा, क्लाऊड आणि आयओटी हे आहेत.

· ज्यांची डिजिटल परिपक्वता उच्च आहे अशा कंपन्यांची ५ सर्वोच्च वैशिष्ट्ये:

o डिजिटल परिवर्तनामध्ये संस्थापक/व्यवसाय मालकाचा सहभाग

o डिजिटलचा संस्कृती म्हणून स्वीकार

o व्यवसायाच्या संचालनाचे तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅकिंग

o संपूर्ण व्यवस्थेचे एकात्मीकरण

o तंत्रज्ञानांचा सक्रिय स्वीकार

· डिजिटल परिपक्वता उच्च असलेल्या एमएसएमईंनी चार प्रमुख सोल्युशन्सचा स्वीकार केला आहे – सहयोग आणि उत्पादनक्षमता, सुरक्षा, क्लाऊड, आयओटी

· ४९% एमएसएमईंनी अद्याप सुरक्षा उत्पादनांची अंमलबजावणी केलेली नाही

भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसायांचे (एमएसएमई) प्रमाण एक-तृतीयांश आहे. देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रमुख आधारस्तंभांमध्ये एमएसएमईचा समावेश आहे. सध्याच्या काळात व्यवसायांना दीर्घकाळपर्यंत टिकून राहण्यासाठी व वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे डिजिटल परिवर्तन होणे गरजेचे आहे, पण एमएसएमई सेक्टरसाठी डिजिटल व तंत्रज्ञानाचा स्वीकार हे एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. आज जागतिक एमएसएमई दिनाच्या निमित्ताने, वोडाफोन आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा एंटरप्राइज विभाग वी बिझनेसने अर्थव्यवस्थेच्या सर्वसमावेशक वृद्धीसाठी एमएसएमईच्या डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

जागतिक एमएसएमई दिनाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठ्या एमएसएमई मूल्यांकनाचे निष्कर्ष प्रकाशित केले, यामध्ये १६ उद्योगक्षेत्रांमधील जवळपास १ लाख लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या.

एमएसएमईना तंत्रज्ञानाचे लाभ घेता यावेत यासाठी उद्योगक्षेत्राशी संबंधित माहिती पुरवणारे रेडीफॉरनेक्स्ट २.० डिजिटल असेसमेंट टूल वी बिझनेसने सुरु केले आहे.

सध्याच्या डिजिटल युगामध्ये एमएसएमईंची उत्पादनक्षमता, ग्राहकांपर्यंत पोहोच आणि सुरक्षा यामध्ये वाढ करणाऱ्या सुविधा प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.

वी बिझनेसने भारतातील एमएसएमई सेक्टरचे सर्वात मोठे मूल्यांकन करून त्याच्या निष्कर्षांच्या आधारे एमएसएमईंच्या डिजिटल सुसज्जतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशित केली आहे. या सर्वेक्षणात १६ उद्योगक्षेत्रांमधील जवळपास १ लाख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले होते. एमएसएमईंची डिजिटल परिपक्वता समजून घेण्यासाठी आणि त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात स्वीकार केला आहे याबाबत वी बिझनेसने माहिती दिली आहे. या १६ उद्योगक्षेत्रांमध्ये मीडिया व मनोरंजन, उत्पादन, आयटी व आयटीई, शिक्षण, लॉजिस्टिक्स, व्यावसायिक सेवा, बँकिंग, बांधकाम, खाणकाम इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

३६० डिग्री प्रोग्राममध्ये – १) ‘अनलॉकिंग एमएसएमई ग्रोथ इन्साईट्स’ २०२३ चे निष्कर्ष २) एमएसएमईना तंत्रज्ञानाचे लाभ घेण्यात मदत व्हावी यासाठी अपग्रेडेड डिजिटल सेल्फ इव्हॅल्युएशन टूल; आणि ३) एमएसएमईना प्रगती करण्यात मदत करतील अशा विशेष ऑफर्स यांचा समावेश आहे. वी बिझनेसने या क्षेत्राच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले असून ते आता अजून जास्त मजबूत केले आहे.

वोडाफोन आयडियाचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री. अरविंद नेवतीया यांनी या प्रोग्रामविषयी सांगितले, “भारताच्या जीडीपीमध्ये लघु व मध्यम उद्योगव्यवसायांचे योगदान जवळपास ३०% आहे. महामारीनंतरच्या काळात या क्षेत्रात खूप प्रमाणात डिजिटलायझेशन घडून आले असले तरी त्याचा डिजिटल मॅच्युरिटी इंडेक्स अद्याप देखील ५५ ते ६०% वर आहे. आम्ही असे मानतो की, योग्य तंत्रज्ञान साधनांचा उपयोग करून एमएसएमई त्यांच्या वृद्धी क्षमतांचा उत्तम उपयोग करून घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये अजून जास्त योगदान देऊ शकतील. एमएसएमईंना त्यांचे निर्णय अधिक सहजपणे घेता यावेत तसेच नेमके कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करायचे, योग्य दिशा कोणती आणि व्यवसायासाठी योग्य उपाययोजना कोणत्या ते ठरवता यावे, त्यांना भविष्यासाठी सुसज्ज करावे हा आमच्या रेडीफॉरनेक्स्ट प्रोग्रामचा उद्देश आहे. उपाययोजनांचा आमचा पोर्टफोलिओ सर्वसमावेशक असून उत्पादनक्षमता वाढावी, ग्राहकांपर्यंत पोहोच वाढावी आणि या डिजिटल युगामध्ये एमएसएमईना सुरक्षा पुरवली जावी यासाठी तो तयार करण्यात आला आहे.”

वी बिझनेसने सर्वेक्षणातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे एमएसएमईसाठी अनुकूल प्रस्ताव तयार केले आहेत जे एमएसएमईंच्या नवीन व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय वी बिझनेसने यावर्षी आपले डिजिटल असेसमेंट टूल देखील प्रगत केले आहे.

रेडीफॉरनेक्स्ट डिजिटल असेसमेंट टूल: डन अँड ब्रॅडस्ट्रीटच्या सहयोगाने वी बिझनेसने एमएसएमईंना त्यांच्या डिजिटल सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यात, कमतरता ओळखण्यात आणि भविष्यासाठी सज्ज व्यवसाय बनण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात मदत करू शकेल असा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेमुळे व्यवसाय मालकांना त्यांच्या सेटअपचे तीन पैलूंच्या आधारे मूल्यांकन करण्यात मदत होते – डिजिटल कस्टमर,