वी ने मे २०२३ मध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये नव्या ऍक्टिव्ह सब्स्क्रायबर्सची सर्वाधिक संख्या नोंदवली

29

ऑगस्ट २०२३ : मे महिन्यात महाराष्ट्र्रात १,९३,४७५ ऍक्टिव्ह सब्स्क्रायबर्स वी कडे आले.

टीआरएआयने मे २०२३ चा सब्स्क्रायबर डेटा नुकताच प्रकाशित केला.

या डेटानुसार महाराष्ट्र सर्कलमध्ये २९,९७६ सब्स्क्रायबर्स नवीन आल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे आता एकूण सब्स्क्रायबर्सची संख्या ९,१४,६४,३९१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्राची टेली डेन्सिटी १०१.७% आहे.

जिओ (१,४७,१५२ ऍक्टिव्ह सब्स्क्रायबर्स कमी झाले) आणि एअरटेल (२६,१७९ ऍक्टिव्ह सब्स्क्रायबर्स कमी झाले) यांच्या तुलनेत, वी ने मे २०२३ मध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये सर्वात जास्त म्हणजे १,९३,४७५ ऍक्टिव्ह सब्स्क्रायबर्स जोडले आहेत.

महाराष्ट्रात वी चे एकूण २३८३०५४२ सब्स्क्रायबर्स असून टेलिकॉम बाजारपेठेतील हिस्सेदारी २६.०५% आहे.

अहवालातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा:  

https://www.trai.gov.in/sites/default/files/PR_No.66of2023.pdf