वी ने प्रस्तुत केले नवे अनलिमिटेड नाईट डेटा पॅक – ‘वी छोटा हिरो’

45

पुणे : वी ने प्रस्तुत केले नवे अनलिमिटेड नाईट डेटा पॅक – ‘वी छोटा हिरो’. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजात मोबाईल इंटरनेट हा महत्त्वाचा घटक बनला आहे. काम असो किंवा मनोरंजन, इंटरनेट अत्यावश्यक असते. कामाची हायब्रीड संस्कृती, कन्टेन्टचा प्रचंड मोठा ओघ, सोशल चॅट्स आणि सर्फिंग, इमर्सिव्ह गेमिंग इत्यादींमुळे प्रीपेड ग्राहकांना डेटा कोटा संपण्याची चिंता सतत वाटत असते. त्याचवेळी पिरॅमिडच्या तळाशी असलेले ग्राहक आजही त्यांच्या मूलभूत गरजा व आवश्यकतांसाठी डेटा मिळवण्यासाठी धडपड करत असतात.

डेटा संपण्याच्या बाबतीत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि समाजातील सर्व स्तरांमधील लोकांना डेटा उपलब्ध होत राहावा यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार वी ने दोन नवीन अनलिमिटेड नाईट डेटा पॅक्स अर्थात वी छोटा हिरो पॅक्स सादर करून आपल्या हिरो प्रस्तावांमध्ये अजून वाढ केली आहे.

प्रीपेड ग्राहकांना मध्यरात्रीपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण रात्रभर, एका दिवसासाठी फक्त १७ रुपये आणि ७ दिवसांसाठी फक्त ५७ रुपये या अतिशय परवडण्याजोग्या किमतींना बिन्ज करू शकतील. या अतिशय अनोख्या प्रस्तावाचा लाभ घेऊन पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या यूजर्सना अमर्याद डेटाचा लाभ घेण्याची संधी देऊन प्रीपेड ग्राहकांसाठी प्राधान्य दिली जाणारी टेलिकॉम पुरवठादार बनावे हा वी चा उद्देश आहे.

हे पॅक खासकरून कॉलेज/हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी आणि नुकतेच नोकरीला लागलेल्या व्यक्ती यांच्यासाठी बनवण्यात आले आहेत, ज्यांच्याकडे ब्रॉडबँड सेवा नसतात पण सिनेमे पाहण्यासाठी, व्हिडिओ स्ट्रीम करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी, सर्फिंग, चॅटिंग, काम किंवा अभ्यास अशा विविध कारणांसाठी रात्रीच्या वेळी हाय स्पीड डेटाची गरज लागू शकते. वी ग्राहक या पॅकचा वी गेम्स खेळण्यासाठी, वी मुव्हीज अँड टीव्हीवर नवनवीन सिनेमे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा वी ऍपवर वी म्युझिकवर आवडती गाणी ऐकण्यासाठी करू शकतात.

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्यासाठी अमर्याद संधींचे दरवाजे खुले करू शकतील अशी अर्थपूर्ण उत्पादने, ऑफर्स डिझाईन करून आज आणि भविष्यात देखील स्वतःचा विकास घडवून आणण्यात भारतीयांची मदत करणे हा वीचा उद्देश आहे.  प्रीपेड ग्राहकांच्या पसंतीची, प्राधान्य दिली जाणारी टेलिकॉम सेवा बनण्याच्या उद्देशाने ही अनोखी सेवा सादर करण्यात आली आहे.