वी ग्राहकांसाठी विशेष संधी : भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जनरल ड्युटी परीक्षेची तयारी वी ऍपवर करता येणार  

64

पुणे, १० जानेवारी २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशनने (एसएससी) जनरल ड्युटी (जीडी) परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे.  एसएससी – जीडी परीक्षा देण्यासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी असते. भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये कॉन्स्टेबल्सरायफलमॅन आणि शिपाई या पदांसाठी बोर्डाने २४००० पेक्षा जास्त रिक्त जागांची घोषणा केली आहे.

देशभरात घेतल्या जाणाऱ्या विविध सरकारी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी भारतातील युवकांना सक्षम बनवण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांतर्गतदेशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने परीक्षासोबत सहयोग करत आपल्या युजर्सना सर्वसमावेशक अभ्यास साहित्य आणि सर्वोत्तम शिक्षकांचे लाईव्ह व्हर्च्युअल क्लासेस उपलब्ध करवून दिले आहेत.  वी ऍपमधील वी जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर यांचा लाभ घेता येईल.    

परीक्षांच्या तयारीसाठीचे सर्व अभ्यास साहित्य एसएससी जीडी परीक्षेच्या अभ्यासक्रमाला अनुरूप असूनवी ऍपवरील वी जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये इंग्लिशगणित आणि जनरल इंटेलिजन्स व रिजनिंग यासारख्या विषयांचे व्हर्च्युअल क्लासेस व अभ्यास साहित्य वी ने उपलब्ध करवून दिले आहे.

परीक्षेच्या तयारीचे साहित्य अशाप्रकारे मिळवता येईल :

  • वी ऍपवर जॉब्स सेक्शनवर क्लिक करा.
  • सरकारी नौकरी वर क्लिक करा.
  • प्रोफाईल माहिती भरा.
  • परीक्षेचा प्रकार निवडा.
  • तुम्हाला जी भाषा हवी आहे ती निवडा.
  • तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे ती परीक्षा निवडा.
  • परीक्षा साहित्य मिळवून अभ्यास करायला सुरुवात करा.

कमीत कमी दहावी पास असलेले१८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. १० जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. बीएसएफसीआयएसएफइंडो तिबेटियन बॉर्डर पोलीससेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स या विभागांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई या पदांवर नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

आकडेवारी असे दर्शवते कीसरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी दरवर्षी ७ कोटी भारतीय अर्ज करतात.  यापैकी बहुतांश उमेदवार ग्रामीण भागांमधील असतात.  व्यवसाय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीऐवजी सरकारी नोकरीला प्राधान्य देणाऱ्या भारतीय युवकांचे प्रमाण तब्बल ५५% आहे. वी जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये विविध केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य पुरवले जातेयामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनबँकिंगशिक्षणसंरक्षणरेल्वे इत्यादी विविध विभागांच्या १५० पेक्षा जास्त परीक्षांसाठी असंख्य मॉक टेस्ट्सचा समावेश आहे. यासाठी एका वर्षासाठी फक्त २४९ रुपये इतके नाममात्र सब्स्क्रिप्शन शुल्क आकारले जाते.  वी जॉब्स अँड एज्युकेशनवर विविध विभागांसाठी एक मोफत मॉक टेस्ट देखील उपलब्ध करवून दिली जाते.

परीक्षांच्या तयारीसाठी नीट संशोधन करून तयार करण्यात आलेले अभ्यास साहित्य वी ऍपवर वी जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वी युजर्स आपल्या सोयीप्रमाणे कुठेहीकधीही त्याचा लाभ घेऊ शकतात.  ‘वी’ ऍपवर ‘वी जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म अपना‘, इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म एनगुरू‘ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म परीक्षा‘ यांना एकीकृत करून घेण्यात आले आहे.