पुणे, २२ जानेवारी २०२३ : सेवा योजना’ याला NSS या नावाने देखील ओळखले जाते. विविध सामुदायिक सेवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
याच NSS कॅम्प अंतर्गत विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्याल येथील समाज कल्याण आणि विकास समिती या विद्यार्थ्यांच्या समितीद्वारे कोंढाणपुर येथे २४ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ या दरम्यान आयोजित केलेल्या कॅम्प मध्ये सहभाग दर्शविण्यात आला. NSS ६५ अश्या नावाने ही तब्बल ५० जणांची तुकडी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होती.
कॅम्प अंतर्गत राबवलेल्या विविध कार्यक्रमध्ये जसे की पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, वॉल पेंटिंग, इत्यादी उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले, समजसेवे सोबतच महिला सशक्तीकरण हा एक बहुमोल अनु महत्त्वाचा कार्यक्रम या कॅम्पच्या माध्यमाने पार पाडण्यात आला.
याच्या अंतर्गत महिलांना स्वसंरक्षण, योगा, आरोग्य अन् स्वच्छता, व्यावसायिक विकास यासारख्या अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या, NSS unit ६५ मधील विद्यार्थ्यांद्वारे गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात आले ज्याचा अहवाल गावाच्या विकास नियोजनासाठी तलाठी कार्यालयालात सुपूर्त करण्यात आला.
या व्यतिरिक्त आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते ज्या मध्ये पुण्यातील डॉक्टर्स चा उत्तम सहभाग दिसला. प्राण्यांसाठी देखील प्राथमिक आरोग्य तपासणी केली गेली. गावात शिकणाऱ्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासा व्यतिरिक्त उपक्रम जसे नृत्य, गायन, हस्ताकला, करियर मार्गदर्शन यामध्ये सामील करून घेण्यात आले.