विद्या व्हॅलीच्या विजयात सिद्धार्थचे चार गोल

89
पुणे, ७ डिसेंबर २०२२ :  टाटा ऑटोकॉम्प पुरस्तकृत लॉयला करंडक आतंरशालेय फुटबॉल स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली आणि सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत सिद्धार्थ संथालकरच्या चार गोलच्या जोरावर विद्या व्हॅली संघाने ब्ल्यू रिजचे आव्हान ५-० असे सहज संपुष्टात आणले. पाचवा गोल सिद्धांत जाधवने केला.
या गटातील अन्य एका सामन्यातन कॅविन पिल्ले, अॅरॉन डिसूझा, शॉन परेरा यांनी केलेल्या गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंटने कल्याणी स्कूलचा ३-१ असा पराभव केला. कल्याणी स्कूलसाठी प्रणय चैनानीने गोल केला.
विद्या व्हॅली संघाने १२ वर्षांखालील गटातूनही ब्ल्यू रीज संघावर विजय मिळविताना तीन गोल केले. विद्या व्हॅलीने सामना ३-१ असा जिंकला. विजयी संघाकडून दक्ष धूतने दोनन तर मल्हार देशमुखने एक गोल केला. ब्ल्यू रिज संघाने १४ वर्षांखालील गटात मात्र विद्या व्हॅलीचा २-० असा पराभव केला. अगरिम सिंग आणि ऋग्वेद मुसळे यांनी गोल केले.
निकाल –
१६ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला ३ (कॅविन पिल्ले १०वे, अॅरन डीसूझा ४५, शॉन परेरा ४७वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल १ (प्रणय चैनानी १२वे मिनिट)
विद्या व्हॅली ५ (सिद्धार्थ सांथोलकर ३१, ३४, ५५, ५७वे मिनिट, सिद्धांत जाधव ४१वे मिनिट) वि.वि. ब्ल्यू रिज ०
१४ वर्षांखालील – ब्ल्यू रिज २ (अगरिम सिंग ८वे मिनिट, ऋग्वेद मुसळे २५वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली २-०
१२ वर्षांखालील – विद्या व्हॅली ३ (मल्हार देशमुख १६वे, दक्ष धूत ३५, ३९वे मिनिट) वि.वि. ब्ल्यू रिज १ (शारजील रिझवी १७वे मिनिट)