विटेस्को टेक्नोलॉजीज’च्या वतीने भारतात दुचाकीकरिता नाविन्यपूर्ण विद्युतीकरण पर्यायांची विस्तृत श्रेणी सादर

48
Klaus-Hau-Executive-Board-Member-and-Head-of-Powertrain-Solutions-Division-and-Anurag-Garg-Managing-Director-with-Demo-Bike

पुणे, ०६ जुलै, २०२३ : विटेस्को टेक्नोलॉजीज हा ई-मोबिलिटीकरिता प्रगत पॉवरट्रेन तंत्रज्ञान आणि पर्यायांचा अग्रगण्य आंतरराष्ट्रीय पुरवठादार असून दुचाकी बाजारपेठेत त्यांची नावीन्यपूर्ण विद्युतीकरणावर चालणारे उत्पादन पर्याय सादर करत आहेत. पहिल्यांदाच, कंपनीने भारतात 3 to 7 kW output (equivalent up to 150 cc for combustion engines) सह इलेक्ट्रिक लाइट मोटरसायकल आणि स्कूटरकरिता 48-volt system ची डेमो आवृत्ती सादर केली आहे. दुचाकी वाहनांत कंपनी दोन दशकांपासून कौशल्य राखत असून विटेस्को टेक्नॉलॉजीजला आपल्या नवीन घडामोडींमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील इन-हाऊस सीरिज उत्पादनांचाही फायदा होतो. कंपनीने उच्च-कार्यक्षमता असलेल्या तीन तसेच चारचाकीसाठी अनुकूल उपाय म्हणून, प्रवासी वाहन बाजारात आधीच स्वतःला सिद्ध केलेल्या उच्च समाकलित EMR3 (3rd generation of Electronics Motor Reducer) इलेक्ट्रिक एक्सल ड्राइव्हचे प्रदर्शन केले आहे.

  • छोट्या दुचाकींसाठी इलेक्ट्रिक ड्राईव्ह: 48-volt system सह पहिली डेमो वेहिकल
  • इंटीग्रेटेड इलेक्ट्रिक एक्सेल ड्राईव्ह: वजनाने हलकी, कॉम्पॅक्ट आणि शक्तिशाली संपूर्णत: विजेवर चालणारी तीन किंवा चारचाकी वाहने
  • विटेस्को’च्या तळेगाव, पुणे येथील अत्याधुनिक सुविधाकेंद्रांत डेमो स्कूटरचे सादरीकरण

क्लॉस हाऊ, एक्झिकिटीव्ह बोर्ड मेंबर अँड हेड ऑफ पॉवरट्रेन सोल्यूशन्स डिव्हिजन आणि विटेस्को टेक्नॉलॉजीज इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि कंट्री हेड अनुराग गर्ग यांच्या शुभहस्ते डेमो स्कूटरचे अनावरण तळेगाव, पुणे येथील सुविधाकेंद्रांत करण्यात आले.

यावेळी बोलताना क्लॉस हाऊ म्हणाले, “मला खरोखर विश्वास आहे की इलेक्ट्रिक हेच भविष्य आहे, आणि आम्ही भारतातील आमचे पहिले 48-volt डेमो वाहन प्रदर्शित करून उत्सुक आहोत”. कंपनीच्या जागतिक वृद्धी धोरणात भारत महत्त्वाचा वाटा उचलत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, भारताचा ऑटोमोटिव्ह उद्योग सध्या त्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण बदलातून जात आहे. ई-मोबिलिटी ही मुख्य प्रवाहातील घटना बनते आहे आणि आमचा पोर्टफोलिओ स्पष्टपणे विद्युतीकृत वाहनांसाठी जागतिक, स्केलेबल प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करतो. आमच्या अनुभवामुळे, इलेक्ट्रॉनिक्स कौशल्य आणि मोठे उत्पादन पोर्टफोलिओमुळे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. आम्हाला विद्युतीकरणाच्या क्षेत्रातील 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सध्या आमच्या पोर्टफोलिओमध्ये विद्युतीकरण केलेल्या वाहनांसाठी आवश्यक असलेले अंदाजे 80% घटक आहेत. आमचे उद्दिष्ट विद्युतीकरण तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट वाढ साध्य करणे आणि व्यवसाय विस्तारीकरण करण्याचे आहे.

मॅनेजिंग डिरेक्टर अँड कंट्री हेड ऑफ विटेस्को टेक्नोलॉजीज इंडिया अनुराग गर्ग म्हणाले, “आम्ही भारतात प्रथमच इलेक्ट्रिक लाईट स्कूटर आणि बाईकसाठी आमच्या 48-volt सिस्टमची डेमो आवृत्ती लोकांसमोर सादर करून उत्सुक आहोत. इतर ई-मोबिलिटी प्रकल्पांसाठी मानके स्थापित करताना ईव्हीकरिता नवीन पिढीच्या दूरदृष्टीचा वेध घेणे हा या संकल्पनेचा आमचा उद्देश होता. जागतिक स्तरावर, आम्ही 2006 पासून या विभागामध्ये गुंतवणूक करत आहोत आणि एक दशकाहून अधिक काळ यशस्वीरित्या ई-इनोव्हेशन बाजारात आणले आहेत. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील दुचाकी आणि पॉवरस्पोर्ट्ससाठी अभिनव विद्युतीकरण उत्पादन पर्यायाची कार्यक्षमता आणि श्रेणीला चालना देत राहू.”