विकास मानकतलाने कलर्सवरील शो ‘बिग बॉस १६’चा घेतला निरोप

65

पुणे, २ जानेवारी २०२२ : कलर्सवरील शो ‘बिग बॉस १६’मधील प्रखर ‘वीकेण्‍ड का वार’विकास मानकतलाच्‍या एलिमिनेशनसह समाप्‍त झाला. खरे तथ्‍य, वास्‍तविक चौकशी व धक्‍कादायक बाबींच्‍या शृंखलेनंतर ‘वार’ने उघडकीस आणले की, दुसरा वाइल्‍डकार्ड स्‍पर्धक विकासने घरातील उर्वरित सदस्‍यांचा निरोप घेतला. विकास आठ नामांकन केलेल्‍या स्‍पर्धकांपैकी एक होता, ज्‍यामध्‍ये श्रीजिता डे, प्रियंका चहर चौधरी, सुंबुल तौकिर, निमरित कौर अहलुवालिया, सौंदर्या शर्मा, टिना दत्तव शालीन भनोट यांचा समावेश होता. प्रेक्षकांकडून कमी मते मिळालेल्‍या विकासला ‘बिग बॉस १६’मधून बाहेर पडावे लागले आणि निरोप घेताना त्‍याने उर्वरित स्‍पर्धकांप्रती दाखवलेल्‍या सकारात्‍मक दृष्टिकोनामधून त्‍याची उत्तम स्‍पर्धात्‍मक वृत्ती दिसून आली.

विकास हा मालिकेचा दुसरा वाइल्‍डकार्ड स्‍पर्धक होता आणि त्‍याने प्रबळ पुढाकार घेत स्‍वत:मधील क्षमता त्‍वरित दाखवून दिल्‍या. शालिनसोबतच्‍या ब्रोमान्‍समध्‍ये (बंधुभाव) अनेक चढ-उतार राहिले असताना देखील त्‍याने शोनंतर देखील त्‍याच्‍यासोबतची मैत्री कायम ठेवण्‍याचे वचन दिले. स्‍पष्‍टपणे मत व्‍यक्‍त करणारा विकास अर्चना गौतमच्‍या ऑन-पॉइण्‍ट मिमिक्री करण्‍यासाठी लोकप्रिय ठरला. तिच्‍यासोबत त्‍याचे समीकरण फारसे चांगले नव्‍हते. शोमध्‍ये फक्‍त २० दिवस व्‍यतित केले असताना देखील त्‍याचा प्रवास संस्‍मरणीय राहिला आहे.

विकास मानकतला म्‍हणाला, ‘‘मी शक्‍यतो फक्‍त सकारात्‍मक गोष्‍टी लक्षात ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतो. माझी बिग बॉस घरामध्‍ये अधिक काळ राहण्‍याची इच्‍छा होती, पण माझ्या मते, प्रत्‍येक घडणारी गोष्‍ट चांगल्‍यासाठीच असते. मी घरातील या २१ दिवसांमध्‍ये अद्भुत आठवणी निर्माण केल्‍या आहेत. भारतातील सर्वाधिक पाहिला जाणारा रिअॅलिटी शोच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांशी कनेक्‍ट होण्‍यासारखी उत्तम बाब नाही. मी नेहमी स्‍वत:शी प्रामाणिक राहण्‍याचा प्रयत्‍न केला आहे आणि मी आशा करतो की माझा प्रामाणिकपणा,सचोटी, प्रतिष्‍ठा व इतर सर्व भावना पडद्यावर देखील उत्तमरित्‍या दिसून येतील. मी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलेल्‍या प्रेक्षकांचे, तसेच मला पाठिंबा दिलेल्‍या स्‍पर्धकांचे आभार मानतो. मी या सीझनच्‍या विजेत्‍याला पाहण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे. माझे मत अब्‍दू व प्रियंका यांना आहे. सर्वांना प्रेममय शुभेच्‍छा.’’

सर्व उत्‍साह व ड्रामाचा अनुभव घेण्‍यासाठी पाहत राहा ‘बिग बॉस १६’पॉवर्ड बाय ट्रेसमे, स्‍पेशल पार्टनर चिंग्‍स शेजवान चटणीआणि मेक-अप पार्टनर मायग्‍लॅम दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता फक्‍त कलर्स व वूटवर.