विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी नायका तर्फे नवीन वरिष्ठ नेत्यांचे स्वागत भारतातील आघाडीचे सौंदर्य आणि फॅशन डेस्टिनेशन असलेल्या नायका तर्फे त्यांच्या विकासाच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करण्यासाठी तंत्रज्ञान, वित्त, व्यवसाय आणि विपणन या क्षेत्रातील अनेक नवीन वरिष्ठ नेत्यांचे स्वागत करण्यात येत आहे. नवीन नेते विद्यमान नेतृत्वात सामील होतील. यामध्ये आता ५० हून अधिक नेत्यांचा समावेश असेल आणि कंपनीच्या विकासाचे धोरण पुढे नेण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. प्रत्येक नेत्याची परिपक्वता, अनुभवाची समृद्धता, उद्योग कौशल्य, नावीन्य आणि विकासाची आवड यादृष्टीने काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे.
नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या, “कंपनीचे महत्त्वाचे व्यवसाय आणि कार्य पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रत्येक नवीन नेत्याचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. नायका परिसंस्था व्याप्ती आणि प्रमाण यात विस्तारत असल्यामुळे एक सामाईक उद्योजकता तत्व आणि मानसिकता मनात ठेऊन ही नेतृत्व टीम यशासाठी सज्ज आहे.”
तंत्रज्ञान आणि उत्पादन
राजेश उप्पलापती हे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. ॲमेझॉनसाठी २० वर्षे विविध भूमिका आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये काम केल्यामुळे आणि अलीकडेच Intuit येथे, मोठ्या संघांचे नेतृत्व करताना यशस्वी, जागतिक दर्जाचे, मोठ्या प्रमाणावर, कामगिरी करणारे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्प वितरित करण्याचे त्यांचे सिद्धहस्त ट्रॅक रेकॉर्ड आहे.
अभिषेक अवस्थी, ईश्वर परला, ध्रुव माथूर आणि अमित कुलश्रेष्ठ विद्यमान तंत्रज्ञान नेतृत्व संघात सामील झाले आहेत. वॉलमार्ट, ॲमेझॉन, मॅजिकपिन आणि एलबीबी सारख्या संस्थांमध्ये ६० वर्षांहून अधिक कालावधीच्या सामूहिक अनुभवासह ते उत्पादन आणि अभियांत्रिकीमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असून कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाविन्य आणि विकास करण्यास मदत करत आहेत.
वित्त, कायदा आणि नियामक
नायकाचे वैविध्यपूर्ण व्यवसाय स्वतःचा मार्ग तयार करत असल्याने वित्त, कायदेशीर आणि नियामक कार्यांमध्ये वाढती संधी आणि गुंतागुंत आहे.
नायकाचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पी. गणेश वित्त विभागाचे नेतृत्व करत आहेत. TAFE ग्रुप, पिडिलाइट इंडस्ट्रीज, गोदरेज ग्रुप, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स यासारख्या कंपन्यांमध्ये सीएफओ म्हणून काम करताना फायनान्शिअल रिपोर्टिंग, बिझनेस फायनान्स, टॅक्सेशन, इन्व्हेस्टर रिलेशन्स, बँकिंग, M&A आणि कॉर्पोरेट लॉ मधील २७ हून अधिक वर्षांचा त्यांचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे.
व्होडाफोन आयडिया, शादी.कॉम, अल्ट्राटेक सिमेंट, व्हायकॉम १८ यांसारख्या संस्थांमध्ये वैविध्यपूर्ण क्षेत्रातील २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह सुजीत जैन हे कंपनीचे मुख्य कायदेशीर आणि नियामक अधिकारी आहेत. ते कायदेशीर, कंपनी सेक्रेटरीयल, अनुपालन आणि नियामक कार्यांचे नेतृत्व करतात.
अशोक लेलँड, फ्लिपकार्ट आणि आदित्य बिर्ला ग्रुप सारख्या कंपन्यांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव असलेले टी.व्ही. वेंकटरामन, अंतर्गत ऑडिट आणि जोखीम व्यवस्थापन चार्टरसाठी जबाबदार असलेल्या टीममध्ये सहभागी झाले आहेत.
व्यवसाय आणि महसूल
युनिलिव्हरमध्ये २७ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या विशाल गुप्ता यांना वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेश आणि बीपीसी श्रेणींमध्ये विस्तृत अनुभव आहे. नायका येथे सौंदर्य ग्राहक व्यवसायाचे प्रमुख म्हणून त्यांच्या भूमिकेत ते नाविन्यपूर्णता, ब्रँड बिल्डिंग, विकास आणि व्यवसायासाठी नफा मिळवण्याच्या कामाचे नेतृत्व करत आहेत. ते सुपरस्टोअर बाय नायका, eB2B वितरण व्यवसायाचे नेतृत्व देखील करतील. या दोन धोरणात्मक आणि उच्च वाढीच्या व्यवसायांसाठी ते पुढील वाढीचे नेतृत्व करतील.
डॉ. सुधाकर वाय म्हसकर मुख्य संशोधन आणि विकास आणि गुणवत्ता अधिकारी म्हणून नायकाच्या ग्राहक व्यवसायात नावीन्यपूर्णतेचे नेतृत्व करतात. पॅकेजिंग, ग्राहक माहिती, गुणवत्ता आणि तांत्रिक नियमांसह नवीन उत्पादनांच्या विकासामधील कौशल्यासह त्यांना युनिलिव्हर आणि मॅरिकोमध्ये ३० हून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.
युनिलिव्हरमध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले शैलेंद्र सिंग श्रेणी आणि ब्रँड व्यवस्थापन कार्यामध्ये सौंदर्य ईकॉमर्स व्यवसायाला पाठबळ देत आहेत.
विपणन आणि ग्राहक वाढ
परफॉर्मन्स मार्केटिंगचे नेतृत्व करण्यासाठी सुधांश कुमार, ग्राहक जीवनचक्र व्यवस्थापन विभागाचे नेतृत्व करण्यासाठी प्रिया बेलुब्बी आणि कंटेंट चार्टरचे नेतृत्व करण्यासाठी सुचिता सलवान या नवीन नेत्यांच्या सहभागामुळे नायका मधील विपणन नेतृत्व मजबूत झाले आहे.
ॲमेझॉन, मिंत्रा, लिव्हस्पेस, हॉटस्टार आणि एलबीबी यासारख्या डिजिटली अग्रणी संस्थांमध्ये ४० वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आणि वैविध्यपूर्ण ज्ञान यांसह ते सहभागी होत आहेत. या नवीन भूमिकांमधून विकास आणि निष्ठा यांना चालना देणाऱ्या ग्राहक-केंद्रित विपणन धोरणांप्रती असलेली नायकाची बांधिलकी दिसून येते.