वायफळ बडबड करू नकोस, तुझे काम तू कर : मनसेच्या निलेश काळेंचा प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला सज्जड दम; फेसबुक वरील ती पोस्ट केली डिलीट

99
Nilesh Kale & Kishor Mane

पुणे : पुण्यात तरुणीवर कोयत्याने जो भ्याड हल्ला झाला त्या प्रसंगात त्या मुलीचे प्राण ज्या लेशपांल ने वाचवले त्याचे सर्व ठिकाणी कौतूक व सन्मान होत आहे. या विषयाला अनुसरून मराठी अभिनेता किशोर माने याने फेसबुक माध्यमातून ”प्रोटीन पावडर खाऊन, इंजेक्शन घेउन, जिम मध्ये जाऊन दंड फुगवण्या पेक्षा पुस्तके वाचा- विद्वान व्हा, धैर्यशील व्हा’ अशी जहिर पोस्ट टाकत लेशपाल ला शुभेच्छा दिल्या.

लेशपाल चे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु शुभेच्छा देताना जिम व प्रोटीन पावडर हा सर्व संदर्भ देऊन चुकीचे विधान करत जिम व्यवसायिक, सरकार मान्यताप्राप्त ते अधिकृत प्रोटीन पावडर विकणारे व्यवसायिक, जिम कोच यांचा दाखल देण्याची काय गरज? यांवर सर्वांनी नाराजी व्यक्त केली. सर्वांचे मन दुखावले गेले.

मनसे शारीरिक सेना पुणे शहर व पुणे फिटनेस क्लब अध्यक्ष निलेश काळे यांनी प्रतिक्रिया देत किशोर माने यांस पोस्ट डिलिट करण्यास भाग पाडले. तसेच संदर्भ नीट द्या असेही सुचवले. चुकीच्या वक्तव्यांस मनसे शारीरिक सेना नक्की दणका देईल असा इशाराही त्यांनी दिला.

हा इशारा मिळताच काही वेळातच सर्व कमेंट्स पाहून ती पोस्ट डिलिट करण्यात आली. त्या वेळेस त्यांच्या सोबत तेव्हा सागर वेताळ, राजेश काळे व फिटनेस व्यवसायातील इतर कोचही उपस्थित होते.