हेलॉन च्या (पूर्वाश्रमीच्या ग्लॅक्सोस्मिथलाईन कन्झ्युमर हेल्थकेअर) च्या सेन्सोडाईन या आघाडीच्या मौखिक आरोग्य ब्रॅन्ड तर्फे १३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ च्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘बीसन्सेटिव्हटू ओरल हेल्थ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्राहकांना मौखिक आरोग्यासाठी जागरुक करुन त्यांना दातां विषयी मुलभूत सल्लामसलत ही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
सेन्सोडाईनच्या टिम कडून जनतेमध्ये मौखिक आरोग्या विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने भारतातील चार विभागात असलेल्या ७० शहरांत ५०० हून अधिक डेंटल कॅम्प्सचे आयोजन करण्याची योजना आखली असून याचा लाभ अंदाजे ५ हजार रुग्णांना होणार आहे. त्याच बरोबर त्यांनी ८५ शहरांतील १०० हून अधिक दंतवैद्यकीय महाविद्यालयांसह ३हजार डेंटल क्लिनिक्स बरोबर भागीदारी केली आहे. सेन्सोडाईन कडून संपूर्ण भारतातील १ लाखांहून अधिक रुग्णांच्या लाभासाठी मोफत डेंटिस्ट कडून सल्ला मिळण्याची सोय केली आहे. प्रॅक्टो बरोबरच्या भागीदारीतून सेन्सोडाईनच्या टिमने ३० हजारांहून अधिक लोकांना मोफत डेंटिस्ट कडून सल्ला उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे.
या मोहिमेच्या यशस्वीते विषयी बोलतांना हेलॉन (पूर्वाश्रमीची ग्लॅक्सोस्मिथलाईन कन्झ्युमर हेल्थकेअर) च्या भारतीय उपखंडाच्या ओरल केअर विभागाच्या मार्केटिंग प्रमुख श्रीमती अनुप्रिता चोप्रा यांनी सांगितले “ सेन्सोडाईन हा मागील दशभरापासूनचा भारतातील एक विश्वसनीय ब्रॅन्ड ठ रला आहे. हा ब्रॅन्ड ग्राहकांमध्ये प्रशिक्षण देणारा ब्रॅन्ड म्हणूनही प्रसिध्द आहे. या जागतिक ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने आम्ही लोकांना चांगल्या मौखिक आरोग्यसवयींबाबत जागरुक करत आहोत, जेणेकरुन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारु शकेल. एकीकडे मौखिक आरोग्यासाठी संवेदनशील असतांनाच दुसरीकडे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मौखिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असतो. या मोहिमेच्या माध्यमातून आपण आता लोकांना त्यांच्या मौखिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घेण्यास प्रोत्साहीत करत आहोत.”
हेलॉन (पूर्वाश्रमीची ग्लॅक्सोस्मिथलाईन कन्झ्युमर हेल्थकेअर) च्या कॅटेगरी हेड भावना सिक्का यांनी या मोहिमेविषयी उत्साह दर्शवतांना सांगितले “आमचा असा विश्वास आहे की प्रत्येकाला चांगले मौखिक आरोग्य प्राप्त करण्याचा अधिकार आहे आणि ‘बी सन्सेटिव्ह टू ओरल हेल्थ’ मोहिमेच्या माध्यमातून आम्ही भारतीय लोकांना योग्य ज्ञाना बरोबरच त्यांचे मौखिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय सुचवून दातांच्या आरोग्याविषयी सल्लाही उपलब्ध करुन दिला आहे. या उपक्रमा मुळे आम्ही मौखिक आरोग्या विषयीची आमची वचनबध्दता वाढूवन चांगल्या मौखिक आरोग्या विषयी चे महत्त्व लोकांसमोर आणत आहोत.”