पुणे, प्रतिनिधी – विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी ‘वनराई‘ संस्थेच्यावतीने दरवर्षी पुण्यामध्ये आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
संस्थेअंतर्गत वनराई पर्यावरण वाहिनी आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेचे २० वे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये नाटिका आणि नृत्य असे दोन विभाग असणार आहेत. याची प्राथमिक फेरी १७ जानेवारी रोजी सिंहगड रोड येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृहात सकाळी ९ ते ३ होणार आहे.
यास्पर्धेमध्ये पुण्यातील असंख्य शाळा सहभागी होतात. नाटिका, गीत, पर्यावरण संदेश, समुह नृत्याविष्कार, काव्य व संगीत या निकषांच्या आधारे स्पर्धेचे मुल्यांकन होते. ज्या शाळांनी प्रवेशिका पाठवली नसेल त्यांनी शनिवार दिनांक ७ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रकल्प संचालक प्रा. भारत साबळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.