लॉयला, सेंट जोसेफ अंतिम फेरीत

85

पुणे, २१ नोंव्हेंबर २०२२ : लॉयला आणि सेंट जोसेफ प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानंचद मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने वेदांशू दिसलेच्या ४३व्या मिनिटातील एकमात्र गोलच्या जोरावर सेंट पॅट्रिक प्रशाला संघाचा १-० असा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात सेंट जोसेफ मुलांच्या प्रशालेने ज्योती इंग्लिश प्रशाला संघाचा १४-० असा धुव्वा उडवला. निलकांत देसलेने चार, तर दर्शन राठोडने तीन गोल करून विजयात महत्वाची भूमिका बजावली. धुर्या शहा, अथर्व गोयल, आर्य यादवने प्रत्येकी दोन, शौर्य डोंगरे, स्वरद कांबळेने प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेतील १७ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने आयन पागेदारने नोंदवलेल्या पाच गोलच्या जोरावर मॉडर्न प्रशाला संघाचा ७-३ असा पराभव केला. केतन कदम आणि स्वाज खिलारेने एकेके गोल केला. मॉडर्नकडून श्रेयस मुसळेने एक, तर संचित मुसळेने दोन गोल केले.

दुसऱ्या सामन्यात सेंट जोसेफ प्रशाला संघाने सेंट उर्सुलाचा ७-० असा पराभव केला. अजिंक्य नाईकनवरेने चार, विपुल कुंडगरने दोन, तर अफ्फान मुल्लाने एक गोल केला.

निकाल –

उपांत्य फेरी (१४ वर्षांखालील)
लॉयला प्रशाला १ (वेदनाशु देसले ४८वे मिनिट) वि.वि. सेंट पॅट्रिक प्रशाला ० मध्यंतर ०-०

सेंट जोसेफ प्रशाला १४ (दर्शन राठोड, १, १७, ४९वे मिनिट, धुर्य शहा ६, ४१वे मिनिट, अथर्व गोयल ११, २१वे मिनिट, शौर्य डोंगरे १४वे मिनिट, आर्य यादव १९वे मिनिट, , निळकंठ देवळे २२, २४, ३९वे मिनिट, स्वरद कांबळे ४७वे मिनिट) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल ० मध्यंतर ०-०

१७ वर्षांखालील (उपांत्य फेरी) सेंट जोसेफ मुलांची प्रशाला ९ (विपुल कुंडगर ८, ३८वे मिनिट, अफ्फान मुल्ला १८वे मिनिट, अजिंक्य नाईकनवरे २२, २४, ४०, ४८वे मिनिट) वि.वि. सेंट उर्सुला ०