लॉयला, पेटिट प्रशालेची आगेकूच

80
पुणे, ३० नोव्हेंबर २०२२ :  लॉयला प्रशाला आयोजित आणि टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी यजमान लॉयला आणि जे.एन. पेटिट प्रशाला संघांना संमिश्र यशावर समाधान मानावे लागले.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पेटिट प्रशालेने १२ आणि १४ वर्षांखालील गटात विजय मिळविला. सिद्धांत शुक्ला आणि आद्यन शेखने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर पेटिट प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात ह्यूम मॅकहेन्री प्रशालेचा २-० असा पराभव केला.
त्यानंतर १२ वर्षांखालील गटात आदित्य शेट्टी, डॅनिश गोनल आणि ऋग्वेद घुले यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर पेटिट प्रशाला संघाने ह्यू मॅकहेन्री प्रशालेचाच ३-० असा पराभव केला.
लॉयला प्रशाला संघाने १६ वर्षांखालील गटात सेंट अरनॉल्ड संघाबरोबर १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. अनुम रावतने लॉयला, तर जोहान विनोदने सेंट अरनॉल्डसाठी गोल केला.
याच दोन संघांत झालेल्या १२ वर्षांखालील गटातील सामन्यात लॉयलाने २-० असा विजय मिळविला. प्रणय संचेती आणि आदिराज सिंगने गोल केले.
मुलांच्या १४ वर्षांखालील गटात लॉयलाने सेंट अरनॉल्ड प्रशालेचाच ४-० असा पराभव केला. अरहान शेख, पार्थ शिंदे, परम कुलकर्णी, दर्श कासट यांनी गोल केले.
निकाल – 
१२ वर्षांखालील :
लॉयला प्रशाला : २ (प्रणय संचेती १४वे; आदिराज सिंग २०वे मिनिट) वि.वि. सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल : ० 
जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल : ३ (आदित्य शेट्टी १३वे; दानिश गोनल २४वे; रुग्वेद घुले २८वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल : ०
१४ वर्षांखालील :
लॉयला हायस्कूल : ४ (अरहान शेख २रे; पार्थ शिंदे १२वे; परम कुलकर्णी ३७वे, दर्श कासट ५०वे) वि.वि. सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल : ०
जे.एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल : २ (सिद्धांत साळुंके ४थे; अद्यान शेख ४६वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल : ०
१६ वर्षांखालील :
लॉयला हायस्कूल : १ (ओम रावत १७वे) सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल : १ (जोहान विनोद ३१वे)