पुणे : लीड (LEAD) या भारतातील सर्वांत मोठा स्कूल एडटेक कंपनीच्या २०२३ सालातील इयत्ता १०वीच्या बॅचने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत शैक्षणिक उत्कृष्टतेचा सर्वोच्च स्तर गाठला असून त्यायोगे त्यांच्या शाळांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील छोट्या शहरांतील गुणवान विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन देणाऱ्या लीड सुपर १०० या कार्यक्रमातील २० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. सीबीएसई शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवण्याचे प्रमाण केवळ २ टक्के आहे.
लीड सहयोगी शाळांमधील सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, महाराष्ट्रातील कटफळ येथील झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूलमधील संस्कृती युवराज शिंदे आणि संजीवनी संतोष केंद्रे यांचा समावेश आहे. या दोघींनी अनुक्रमे ९८.६ टक्के आणि ९५.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत; ओडिशातील केओंझार येथील श्री गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बिद्या प्रियदर्शिनी संती हिने ९८.२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. लीड सहयोगी शाळांच्या व्यापक समूहातही ९२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. छोट्या शहरांतील तसेच लीड सेवा देत असलेल्या परवडण्याजोगे शिक्षणशुल्क आकारणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. या विद्यार्थ्यांना जेव्हा उत्कृष्ट शिक्षणाची संधी दिली गेली तेव्हा त्यांनी भारतातील महानगरांतील व भलीमोठी फी आकारणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या तोडीची कामगिरी केली आहे.
महाराष्ट्रातील माणगाव, कुर्डुवाडी, करमाळा आणि अक्कलकोट येथील लीड शाळांतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अक्कलकोटच्या लीड शाळेतील निजगुण मल्लिकार्जुन गद्दाड याने ९६.४ टक्के गुण प्राप्त केले आहेत; करमाळ्यातील लीड शाळेतील स्पर्श मुकेश गरियाने ९६.४ टक्के गुण प्राप्त केले आहेत; अक्कलकोटमधील लीड शाळेतील भूमिका बसवरजा डोंगरीतोटने ९५.२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. लीड शाळेतील दर चारपैकी एका विद्यार्थ्याने ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवले आहेत.
लीडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले, “२०२३ सालात शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या लीड सीबीएसई १०वी विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो! योग्य शालेय एडटेक प्रणालीमुळे भारतभरातील छोट्या शहरांतील विद्यार्थी महानगरे व मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांच्या तोडीची कामगिरी करू शकतात हे या विद्यार्थ्यांनी अध्ययनात केलेली प्रगती आणि त्यांचे शैक्षणिक यश यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या अविश्वसनीय यशात हातभार लावता आला याचा आम्हाला आनंद वाटतो. विद्यार्थ्यांना यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करण्याची क्षमता देण्यासाठी आम्ही समर्पितपणे काम करत राहू.”
हे असामान्य शैक्षणिक यश म्हणजे लीडच्या एकात्मिक शालेय एडटेक प्रणालीच्या प्रभावीपणाची पावती आहे. ही प्रणाली विषयांच्या संकल्पनात्मक आकलनाला प्राधान्य देते आणि संवाद, सहयोग व वस्तुनिष्ठ विचार या २१व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्यांचा पाया घालून देते. लीडचा एनईपी-संलग्न बहुमार्गीय अभ्यासक्रम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती व संशोधनाच्या पायावर उभा आहे आणि विद्यार्थ्यांमधील सुधारणेच्या आवश्यकता ओळखण्यासाठी व व्यक्तीनुरूप अध्ययनासाठी नवोन्मेष्कारी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व कामगिरी दोन्हींना उत्तेजन मिळते.
महाराष्ट्रातील कटफळ येथील झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी संस्कृती युवराज शिंदे म्हणाली, “प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा असलेल्या सीबीएसईच्या १०वी इयत्तेच्या परिक्षेत एवढे चांगले गुण मिळवले याचा मला आनंद वाटतो. माझ्या शाळेतील शिक्षक, माझे आईवडील आणि लीड यांच्या पाठिंब्याशिवाय तसेच मार्गदर्शनाशिवाय हे यश शक्य झाले नसते. लीडचा अभ्यासक्रम व वर्गात शिकवण्याच्या पद्धतींमुळे मला संकल्पना व विषय अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यात मदत झाली आणि माझा शैक्षणिक प्रवासच यामुळे पालटून गेला.”
महाराष्ट्रातील कटफळ येथील झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती इन्सिया नासिकवाला म्हणाल्या, “आम्हाला संस्कृती आणि संजीवनी यांनी सीबीएसईच्या १०वी परीक्षेत केलेल्या उत्तम कामगिरीचा अत्यंत अभिमान वाटतो. हा लक्षणीय निकाल त्यांच्या परिश्रमांची व निर्धाराला तसेच लीडने दिलेल्या सर्वसमावेशक शैक्षणिक सहाय्याला मिळालेली पावती आहे. लीडच्या कठोर इयत्ता १०वी प्रणालीमध्ये सखोल सराव आणि वेळेवर केल्या जाणाऱ्या सुधारणांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्व विषयांतील संकल्पनात्मक स्पष्टता सुधारण्यात मदत झाली आहे.”
लीड भारतभरातील शाळांमध्ये प्रगत सीबीएसई अभ्यासक्रम देऊ करते. तसेच कर्नाटक, तमीळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील राज्य शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांनाही अभ्यासक्रम देऊ करते. लीडचा अभ्यासक्रम संबंधित मंडळांनी घालून दिलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांशी पूर्णपणे संलग्न असतो आणि प्रत्येक मुलाचे शिक्षण खऱ्या अर्थाने सर्वांगीण होईल आणि त्यांची राष्ट्रीय स्तराशी ओळख होईल याची खात्री या अभ्यासक्रमाद्वारे केली जाते.
लीड बाबत
लीड ही लीडरशिप बोलव्हार्डने प्रमोट केलेली भारतातील सर्वात मोठी स्कूल एडटेक कंपनी आहे. २०१२ मध्ये सुमीत मेहता आणि स्मिता देवरा यांनी भारतातील शालेय शिक्षणाचा कायापालट करण्याच्या उद्दिष्टाने लीडची स्थापना केली. यामध्ये तंत्रज्ञानासह अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र एकत्र आणून त्यांचे अध्यापन व अध्ययन यांच्या एकात्मिक प्रणालीत एकात्मीकरण करण्यात आले आहे आणि त्यायोगे भारतभरातील ९,००० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती व शिक्षकांची कामगिरी सुधारली जात आहे.
लीडची एकात्मक सिस्टिम भारतभरातील ४०० हून अधिक नगरे व शहरांमधील शाळांना उपलब्ध आहे. तसेच लीड ५ दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि ५०,००० शिक्षकांचे सक्षमीकरण करत आहे. लीड पॉवर्ड स्कूल्स मुलांना सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि देशव्यापी सुविधा देतात, तसेच त्यांना जीवनात यशस्वी होण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात.