नॅशनल, २०२३: अल्बर्ट आइनस्टाइनचे एक वाक्य आहे, “निसर्गात खोल शिरून पहा आणि मग तुम्हाला सारं काही अधिक चांगलं उमगून येईल.” जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असता, तेव्हा तुमची वाढ होते. स्थानिक लोकांकडून या निसर्गाच्या संवर्धनाबद्दल, आपल्या वारशाबद्दल व संस्कृतीबद्दल आणि म्हणूनच अवघ्या आयुष्याबद्दल किती काही शिकण्यासारखं आहे. चांगले जगण्यासाठी चांगलं वागण्याशी तडजोड करावी लागत नाही – किंबहुना जगण्याच्या या दोन बाजू एकमेकांचे सह-अस्तित्व खूप सुंदर पद्धतीने साकारू शकते, ही गोष्ट या वारशातून पुन:स्थापित होते.
सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटरचा या तत्वज्ञानावर मनापासून विश्वास आहे आणि म्हणूनच चांगले जगणे व चांगले वागणे यांचे मूर्त रूप असलेल्या, यंदा आपले १०वे पर्व साजरे करणाऱ्या झिरो फेस्टिव्हलचा सादरकर्ता प्रायोजक बनणे ही या ब्रॅण्डसाठी गौरवाची बाब आहे. अरुणाचल प्रदेशच्या झिरो व्हॅलीमध्ये भरणारा हा ४ दिवसांचा संगीत महोत्सव देशाचा सर्वाधिक पर्यावरणस्नेही सोहळा आहे, जो सर्व निसर्गप्रेमींना आणि संगीताच्या चाहत्यांना सारख्याच पद्धतीने समृद्ध करणारा आणि मनाला भुरळ पाडणारा अनुभव देऊ करतो. इथे जगण्याचा आनंद मुक्तपणे व मनसोक्त घेऊ पाहणाऱ्या मंडळींना त्यांचे दिवस आणि रात्री हिरवाईने नटलेल्या दऱ्याखोऱ्यांत निनादणाऱ्या मन:स्पर्शी संगीताच्या साथीने साजरे करता येतील, थेट शेतातून ताटात अवतरलेल्या स्थानिक पदार्थांचा अनुभव घेता येईल आणि स्थानिक स्वादांपासून प्रेरणा घेऊन बनविलेल्या पेयांच्या अनुभवात सहभागी होता येईल. वस्तूंचा पुनर्वापर व जुन्या वस्तूंचे नवे उपयोजन शोधण्याच्या कौशल्यावर हुकूमत असणाऱ्या स्थानिक अपाटानी जमातीची शाश्वत जीवनपद्धती शिकून घेण्याची संधीही या समारोहाला उपस्थित राहणाऱ्यांना मिळणार आहे.
या वर्षी हा उत्सव २८ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान भरविला जाणार आहे.
पार्टनर या नात्याने सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि झिरो फेस्टिव्हल या दोघांनीही एका अधिक हरित वसुंधरेची जोपासना करण्याप्रती आणि निसर्गाशी अर्थपूर्ण नाते आकारास आणण्याप्रती सामायिक बांधिलकी जपली आहे. एकमेकांच्या साथीने झिरो फेस्टिव्हल ऑफ म्युझिक आणि सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर यांनी विचारमंथनास उद्युक्त करणाऱ्या मास्टरक्लासेसच्या माध्यमातून विवेकी जीवनपद्धतीचा पुरस्कार करण्याचे, चार दिवस चालणाऱ्या जॉगिंग आणि ते करताना वाटेतील कचरा गोळा करणे अशी दोन्ही कामे साध्य करणाऱ्या‘प्लॉगिंग’च्या साथीने पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याचे आणि खास सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरद्वारे व्हॅलीमध्ये उभारण्यात आलेल्या कॅम्पसाइट्समध्ये राहून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे लक्ष्य आखले आहे. कॅम्पसाठी उभारलेल्या या जागांवर शून्य कचरा मागे रहावा आणि तिथली जमीन आधी होती तशीच निर्मळ रूपात निसर्गाला परत मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये ली रोनाल्डो, लिऑन सोमोव्ह, फरहान, ताबा चाके, मोहीत चौहान, किस नुका, पं. विश्व मोहन भट्ट, गाय बटरी, कोमोरेबी, मॅक अल्ताफ आणि अशा अनेक कलाकारांचे ऊर्जेने भारलेले संगीत एकामागून एक सादर होणार आहे. यावर्षी फेस्टिव्हलने खास इलेक्ट्रॉनिक संगीताला वाहिलेल्या Takvr नावाच्या तिसऱ्या मंचाचीही घोषणा केली आहे. याखेरीज Popi SarmiñCreative Space मध्ये समुदायाशी संवाद साधण्यासाठीचे विविध उपक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
दिएजिओ इंडियाच्या एक्झेक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडंट आणि मार्केटिंग विभागाच्या पोर्टफोलिओ प्रमुख रुचिरा जेटली म्हणाल्या, “सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यापैकी प्रत्येकाला आचरणात आणता येतील अशा गोष्टी जागरुकतेने करण्याचे तत्व मानते. ‘लिव्ह गुड, डू गुड’ हे ब्रॅण्डचे तत्वज्ञान हे आजच्या पिढीला आवडणाऱ्या जगण्याच्या पद्धतीचे प्रतीक आहे आणि झिरो फेस्टिव्हल ऑफ म्युझिकचे शिर्षक प्रायोजक या नात्याने ते सर्वांसमोर मांडण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. या फेस्टिव्हलला भारतातील सर्वाधिक नयनरम्य असे स्थळ लाभले आहे आणि त्याजोडीला जबरदस्त कलाकारांची सादरीकरणे, एक्स्पिरियन्स सेंटर्स, प्लॉगिंगसारख्या पर्यावरणस्नेही कृती, विचारांना चालना देणारे मास्टरक्लासेस अशा अनेक गोष्टी आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून, आपल्या आयुष्यात निसर्गाशी एकरूप होण्याची आस असलेल्या ‘ग्रीन सीकर्स’ अर्थात हिरव्या वाटेच्या प्रवाशांना या संगीतसोहळ्यात एकत्र आणणे आणि विवेकाने जगण्याच्या संकल्पनेचा एकत्रितपणे प्रसार करणे हे आमचे लक्ष्य आहे.”
झिरो फेस्टिव्हलचे को-फाउंडर आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अनुप कुट्टी म्हणाले, “सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसारखी प्रतिष्ठित कंपनी झिरो फेस्टिव्हलसारख्या स्वतंत्र प्रकल्पाला पाठबळ देत आहे ही प्रचंड प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. गेल्या वर्षीही त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आम्ही घेतला असल्याने शाश्वततेविषयीची आमची मूल्ये परस्परांशी जुळणारी आहेत, हे दिसून आले आहे.”
झिरो फेस्टिव्हलचे को-फाउंडर आणि फेस्टिव्हल डिरेक्टर बॉबी हानो म्हणाले, “यामुळे ईशान्येमध्ये जबाबदार पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि यातून पर्यावरणाविषयी आपले उत्तरदायित्त्व मानणाऱ्या पिढीसाठी व संगीतप्रेमींसाठी नवा मार्ग तयार होईल, अशी आशा आहे.”
सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ग्रीन सीकर्सना निसर्गाच्या अस्सल अनुभवांशी नव्याने नाते जोडण्यासाठी आणि मन उल्हसित करण्यासाठी व हे करताना आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घ्यायला शिकण्यासाठी निमंत्रित करू इच्छिते.