लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह भारतातील पहिला जीवन कौशल्य शब्दकोष मराठीत सुरू

74

पुणे२१ डिंसेबर २०२२ : दी लाईफ स्किल्स कॉलॅबोरेटीव्ह (एलएससीने जीवन कौशल्यांचा भारतीय शब्दकोष मराठीत सुरू केला आहेजीवन कौशल्यांचा अभ्यास आता मुलेतरुण प्रौढपालक आणि शिक्षकांसाठी केवळ इंग्रजी भाषेपुरताच मर्यादित  रहाता मराठी भाषेतही उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्याकरिताअनुवादित शब्दकोष आता सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित संदर्भात विकसित करण्यात आला आहेएलएससी भारतीय शब्दकोषभारतातील तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला आणि संदर्भित केलेलाअशा प्रकारचा जीवन कौशल्यांचा पहिला संग्रह असून तो आता इंग्रजीहिंदीमिझो आणि मराठी या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मराठी शब्दकोष हा विशेषतशासकीय आणि शिक्षण तज्ञ यांनी पुरविलेली माहिती आणि त्यांचे  यथार्थ ज्ञान याद्वारे तयार करण्यात आला आहेएलएससी ने  टीचर फाऊंडेशन आणि शांतीलाल मुत्था फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पुणेमहाराष्ट्र येथे मराठी शब्दकोषाचे मूल्यांकन आणि पुनरावलोकन करण्यासाठीशब्दकोश अनुवाद पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन केले होतेमहाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना अनुवादाचा उचित संबंध लक्षात यावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारी विभाग आणि डीआयइटी येथील तज्ञांनी अनुवादाचे मूल्यांकन केलेअशाच प्रकारच्या कार्यशाळा मिझोरामराजस्थान आणि उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आल्या५२ जीवन कौशल्यांमधील प्रत्येक जीवन कौशल्याचे तपशीलवार वर्णन अनुवादित आवृत्त्या इंग्रजी आवृत्तीप्रमाणेच करतातशब्दकोष इथे पाहिला जाऊ शकतो. (http://lifeskillscollaborative.in/glossary/)

या लॉन्चविषयी बोलतांनाडॉविकास गरडउपसंचालकराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्र, म्हणालेजीवन कौशल्यावरील शब्दकोषाची मराठी आवृत्तीराज्य संदर्भीय निवड आणि अभ्यासक्रमपाठ्यपुस्तके आणि राज्याच्या अन्य शैक्षणिक उपक्रमांमध्ये जीवन कौशल्यांचे एकत्रीकरण सुलभ करेलसर्व भागधारकांच्या अभिप्रायांमधून वेळोवेळी शब्दकोष विकसित करीत राहण्याच्या एलएससी च्या धोरणाची मी प्रशंसा करतोहा सामान्य शब्दकोष राष्ट्रीय स्तरावरील धोरणकर्त्यांना आणि विविध स्तरावरील भागधारकांना देखील मदत करेल.

अनुवादित शब्दकोषाच्या लॉन्च प्रसंगीत्यांची मते सामायिक करताना मेघना देसाईसह संचालिका प्रमुख– भारतीय जैन संघटनाम्हणाल्या” एलएससी भारतीय शब्दकोष हाजागतिक आणि संदर्भित अशा दोन्हीही जीवन कौशल्यांमध्ये आणि शब्दसंग्रहामध्ये प्रवेश सक्षम होण्याच्या दृष्टीने कामाचा एक प्राथमिक भाग आहेशब्दकोषाचा उपयोगभागधारकां कडून व्यापक प्रमाणात स्वीकृती मिळविण्याकरिता देखील सक्षम करेल.

लॉन्चविषयी बोलतांना अर्जुन बहादुरप्रमुखलाईफ स्किल्स कॉलॅबोरेटीव्ह म्हणले की आम्ही लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह येथे मराठीत अनुवादित शब्दकोषाद्वारे सर्व ५२ कौशल्यांच्या परिभाषांचा एक सर्वसमावेशक संग्रह एका सोप्या पद्धतीने प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतोज्याद्वारे जीवन कौशल्ये समजून घेण्याच्या सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित पद्धतीचा मार्ग मोकळा होईलआम्हाला अशा आहे की अनुवादित शब्दकोष हा जीवन कौशल्ये शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या प्रक्रियेत पालकशिक्षक आणि तरुण यांचेसाठी एक मौल्यवान जोड म्हणून काम करेल

जीवन कौशल्ये ही अशी क्षमता आहे जी एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक आत्मविश्वाससामाजिक विवेक आणि व्यावसायिक कार्यक्षमतेच्या भावनेने जीवनाच्या विविध संदर्भांमध्ये मार्गदर्शन करण्यास सक्षम करतेजीवन कौशल्ये अशा प्रक्रियांमधून विकसित केली जातात ज्या प्रक्रिया वैयक्तिकस्थानिक आणि प्रादेशिक विविधतेसाठी सर्वसमावेशक आणि संवेदनशील असतात.