लहान शेतकरी यंत्रणेचा अवलंब करू इच्छित असल्याने लहान शेतीय मशीनची मागणीत वाढ

42

पुणे : लहान शेतकरी यंत्रणेचा अवलंब करू इच्छित असल्याने लहान शेतीय मशीनची मागणीत वाढ  भारतातील लहान शेतीय मशीनरी विभाग हा गेल्या दोन वर्षांपासून ३० ते ४० टक्के कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट नुसार वाढताना दिसतो आहे. लहान शेतीय मशीनरीमध्ये पावर टिलर्स आणि पावर वीडर्स आणि हाताने वापरता येऊ शकतील असे ब्रश कटर्स, हेज ट्रिमर्स आणि चेन सॉज चा समावेश होतो. लहान आणि कमी मिळकत असलेल्या भारतातील शेतकऱ्यांपर्यंत शेतीय मशीनरी पोहोचणे हे फ़ार कमी बघायला मिळते कारण या सगळ्या गोष्टींची उपलब्धता ही जमीनीच्या आकारावर आणि जमीनीच्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. ट्रॅक्टर्स हा प्रकार उत्तर भारतात अधिक वापरला जातो, तर पावर ट्रिलर्स हा प्रकार जास्त प्रमाणात दक्षिण आणि पुर्व भारतात वापरला जातो, जिथे लहान आणि कमी मिळकत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

शेताचा आकार कमी होताना दिसून येतो आहे, त्या सह जमीनीची विभागणी देखील होते. लहान आणि कमी मिळकत असलेले शेतकरी , ज्यांचा शेताचा आकार ५ एकर किंवा त्यासमान असतो,ते आपल्या शेतांमध्ये मशीनचा वापर करण्याचा विचार करतात. व्हीएसटी ट्रिलर ट्रॅक्टर , भारतातील एक अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादन करणारी कंपनी असून त्यांनी बाजाराची गरज समजून घेत, लहान शेतीय मशीनरीची विक्री सुरू केली आहे. माती आणि बगीचांमधील मशीनची निर्मीती आणि फ़ॅब्रिकेशन तज्ञ असलेल्या प्युबर्ट नामक कंपनीसह एकत्र येत भारतातील लहान आणि कमी मिळकत असलेल्या शेतकऱ्यांना योग्य त्या उपाय योजना देण्याचा त्यांचा मानस आहे.

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीचा पावर टिलर उद्योगामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असून, भारतातील शेतकऱ्यांना जागतिक गुणवत्तेची उत्पादने परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याप्रती ते बांधिल आहेत, ज्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना चायनामधील कमी गुणवत्ता असलेल्या उत्पादनांचा अवलंब  करावा लागणार नाही. आमचे ध्येय हे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये शेतीय मशीन देण्याचे आहे, कारण जमीनीच्या आणि त्यावर मजूरी करणाऱ्यांचा खर्च हा वाढता आहे. या सगळ्या मशीनरी मुळे कदाचित लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि गावकरी गावाकडे परत येत , पुन्हा एकदा शेती करण्याचा विचार करतील.

व्हीएसटी आरटी७०  पावर वीडर हे एक लहान शेतीय उत्पादन आहे, ज्याची किंमत ही एक लाखापेक्षा थोडी जास्ती आहे, पण ते परवडणारे आणि परिणामकारक आहे. या ट्रॅक्टरचा वापर हा नांगरणी, आंतरिक नांगरणी आणि तण काढण्याकरिता केला जाऊ शकतो. हे एका पेक्षा अधिक पिकांकरिता उपयुक्त आहे जसे आलं, हळद, ऊस, भाज्या, कापूस, हरभरा आणि फ़ळ झाडे. ट्रॅक्टरला डिझल इंजिन दिले गेले आहे ज्याची क्षमता ही ५.५. एचपी @ ३००० आरपीएम आहे, याशिवाय त्यासह नांगरणीची आणि जमीन उकरून काढण्याची साधने दिली गेली आहेत आणि माती उकरण्याकरिता रिवर्स रोटरी दिली गेली आहे.

व्हीएसटी आरटी७० पावर वीडरची मागणी ही लहान आणि कमी मिळकत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये अधिक आहे, कारण त्यांना येणारे कमी पिक, वातावरणामधील बदल आणि मग मिळणारी कमी मिळकत  याचा सामना करावा लागतो.  शेतीय उत्पादनांमुळे बरेच फ़ायदे होतात जसे शेतातील उत्पादकता सुधारते, उत्पादनाचे शुल्क कमी होते, मजूरीवरील खर्च कमी होतो आणि शेतावर विसंबून असलेल्या घरांची मिळकत सुधारते. शेतीय उत्पादनांमुळे शेताची उत्पादकता सुधारते, शेतकऱ्यांना मिळणारा परतावा सुधारतो. जास्तीत जास्त गरज असलेल्या पेरणी आणि कापणीच्या कालावधीमध्ये जेंव्हा मजूर मिळत नाही तेंव्हा काही समस्या या उत्पादनांमुळे सोडविता येऊ शकतात. स्थलांतरणामुळे मजूर मिळत नाही शिवाय त्यांच्या रोजंदारीचा भाव देखील वाढतो मग लहान शेतांकरिता मशीनरी आणि यंत्रणांवर गुंतवणूक करणे तेवढेच महत्वाचे ठरते.  

या साधनांमुळे शेतीय प्रक्रियेची परिणामकारकता सुधारेल. शेतामधील एकूण कामाचा वेळ कमी होईल आणि शेताची उत्पादकता वाढेल तसेच स्त्रोतांचा वापरामध्ये देखील सुधारणा होईल. पिकाचा प्रकारानुसार एकूण पिकामध्ये साधारणपणे १५ ते ५०टक्के वाढ होईल. मजूरीचा खर्च कमी होईल आणि शेती अधिक लाभदायी ठरेल. शेतीय उत्पादनांच्या वापरामुळे जमीनीच्या वापरामध्ये देखील वाढ होते आणि म्हणूनच एकूण पिकं लावण्याची जागा सुद्धा वाढते. अधिक जमीनीचा वापर हा, ट्रॅक्टरचा टिलिंग करण्याच्या परिणामकारकतेमुळे आणि इतर शेतीय कामांमुळे होतो.

लहान आणि कमी मिळकत असलेल्या शेतकऱ्यांना मशीनरी आणि यंत्रणा मिळाल्यामुळे त्यांना मजूर न मिळण्याच्या समस्यांवर देखील उपाय काढता येतो आणि शेताची उत्पादकता देखील सुधारते. भारताची लोकसंख्या२०५० पर्यंत १.७५ अब्जापेक्षा जास्त झालेली असेल. त्यामुळे अन्नाची मागणी देखील वाढेल, पण शेतीय जमीनीमध्ये तर घट येताना दिसते आहे. अजूनही शेती हाच भारतीय आर्थिकतेचा कणा आहे. शेतीय उत्पादनांमध्ये वाढ करणे हा यातील एक महत्वाचा भाग आहे आणि अन्नाची सुरक्षितता करायची असेल तर शेतीय उत्पादनांचा वापर वाढविणे हा एक त्यावरील उपाय ठरू शकतो. शेतीय उत्पादनांचा वापर वाढविणे हे वेगवेगळ्या मार्गाने करता येऊ शकते, जसे लहान ट्रॅक्टर हा शेतातील एक सोपा आणि अगदी परवडणारा उपाय असू शकतो.