लग्नसराईत दिसून आली बँक्वेट हॉलच्या मागणीत ६८% आणि दागिन्यांच्या मागणीत ४३% ची वाढ : जस्ट डायल कंझ्यूमर इनसाईट्स

156
just dial

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२२ : कोविड निर्बंधांमुळे दोन वर्ष सर्व समारंभ साजरे करण्यावर मर्यादा होत्या. यावर्षी मात्र लग्नसराईत विवाहसंबंधित सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी मागणी (वर्ष दर वर्ष) वाढली असून बँक्वेट हॉलसाठीच्या सर्च मध्ये ८३% ची वाढ, केटरर्सच्या सर्च मध्ये ५७% वाढ आणि लग्नासाठीच्या दागदागिन्यांकरता ४४%ची वाढ झाल्याचे जस्ट डायल कंझ्यूमर इनसाईट्सच्या  नवीनतम अहवालात म्हणले आहे.

  •  देशभरात लग्नासाठीचे दागदागिने आणि बँक्वेट हॉलच्या मागणीत मुंबई अग्रेसर, त्यापाठोपाठ दिल्ली आणि हैदराबाद
  • लग्नासाठीच्या दागदागिन्यांकरता सर्वाधिक मागणीसह टियर २ शहरांमध्ये सूरत, राजकोट
  • टियर १ शहरांमध्ये मागणीत २२% वाढ आणि टियर २ शहरांत ४८% वाढ
  • लग्नासाठीचे दागदागिने, बँक्वेट हॉल, डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स आणि केटरर्स या आघाडीच्या ५  सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विवाहसंबंधी सेवा

बँक्वेट हॉल, केटरर्स, डेकोरेटर्स, डीजे, इव्हेंट आयोजक, वेडिंग ज्वेलर्स, टेलर, मेहंदी कलाकार, गुरुजी, फोटोग्राफर, वधू-वर सूचक मंडळे आणि लग्नासाठीचे बँड यांचा समावेश असलेल्या विवाह सेवांसाठी जस्टडायलवरील एकूण मागणीमध्ये भारतातील १,००० गावे आणि शहरांमध्ये ३०% वाढ झाली आहे. ही मागणी प्रामुख्याने टियर २ शहरांत दिसून आली असून तिचे प्रमाण ४८% तर टियर १ शहरांत ते प्रमाण २२% होते.  

या लग्नसराईतील ग्राहकांच्या प्रवाहाबद्दल भाष्य करताना जस्टडायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले: “आम्ही या लग्नाच्या हंगामात मागणीत मोठी वाढ पाहत आहोत कारण भारतात पुढील ३० दिवसांच्या कालावधीत ३२ लाख विवाहसोहळे होतील. कोविड मुळे विवाह समारंभांवर आलेल्या  निर्बंधांमुळे विवाह सेवांसाठी गेली दोन वर्षे कठीण होती. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी विवाह हा एक मोठा चालना देणारा घटक ठरला आहे आणि टियर २ शहरांमध्ये मागणी वेगाने वाढत आहे हे पाहणे उत्साहवर्धक आहे. विवाह विषयक सेवांच्या मागणीत टियर २ शहरात आता टियर १ च्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. यावरून हे देखील प्रतिबिंबित होते की टियर २ गावे आणि शहरांमधील सर्व प्रकारचे व्यवसाय आता त्यांची जास्तीत जास्त पोहोच वाढवण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी ऑनलाइन होत आहेत.”

विवाह सेवांमध्ये, ज्वेलर्स, बँक्वेट हॉल, डेकोरेटर्स, फोटोग्राफर आणि केटरर्स या सर्वाधिक मागणी असलेल्या आघाडीच्या ५ सेवा होत्या आणि प्लॅटफॉर्मवरील लग्नाच्या सेवांशी संबंधित एकूण सर्च मध्ये त्यांचे प्रमाण जवळपास ६०% होते.

लग्नाकरता ज्वेलर्ससाठी मुंबईहून देशभरात सर्वाधिक मागणी आहे आणि त्यानंतर दिल्ली आणि हैदराबादचा क्रमांक लागतो. टियर १ शहरांमधील सर्च २९% वाढला तर टियर २ शहरांमध्ये ४४% वाढ झाली. टियर २ शहरांमध्ये मागणीच्या शर्यतीत जयपूर आघाडीवर होते आणि त्यानंतर सुरत, राजकोट, चंदीगड आणि कोईम्बतूर होते.

सर्व विवाह संबंधित सेवांमध्ये बँक्वेट हॉलची मागणी (वर्ष दर वर्ष) वाढ ही सर्वाधिक होती कारण भारतातील सर्चमध्ये त्यात ६८% वाढ दिसून आली. टियर २ शहरांमध्ये ही मागणी ८३% आणि टियर १ शहरांमध्ये ४६% नी वाढली. बँक्वेट हॉलच्या सर्चमध्ये मुंबईने अव्वल स्थान पटकावले आणि टियर १ शहरांमधील मागणीत जवळपास २७% योगदान दिले, त्यानंतर दिल्ली आणि चेन्नई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बँक्वेट हॉलची सर्वाधिक मागणी असलेली कोईम्बतूर, सुरत, नागपूर, लखनौ आणि पटणा ही आघाडीची ५ टियर २ शहरे होती.

टियर १ शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये सर्वाधिक मागणी वाढल्याने डेकोरेटर्सच्या सर्चमध्ये ३१% ची वाढ झाली आहे. चंदीगड, इंदौर, जयपूर, लखनौ आणि सुरत यांसारख्या शहरांमध्ये सर्वाधिक मागणी वाढताना टियर २ शहरांमधील मागणी ४३%नी वाढली आहे.

देशात लग्नासाठीच्या छायाचित्रकारांची मागणी २३%नी वाढली असून टियर २ शहरांमधील सर्च टियर १ शहरांच्या तुलनेत २.३ पट आहे. टियर १ शहरांद्वारे निर्माण होणाऱ्या मागणीपैकी जवळपास ५०% वाटा मुंबई आणि दिल्लीचा आहे. चंदीगड, लखनौ, पटणा, राजकोट आणि कोईम्बतूर ही लग्न छायाचित्रकारांची सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ शहरे होती.

केटरर्सच्या शोधात ३१% वाढ झाली असून मागणीच्या बाबतीत टियर २ शहरांनी टियर १ शहरांना मागे टाकले आहे. टियर २ शहरांमध्ये मागणी ३१%नी आणि टियर १ शहरांमध्ये ५७%नी वाढली आहे. टियर १ शहरांमध्ये बंगळुरू या यादीत अव्वल क्रमांकावर होते तर त्याखालोखाल मुंबई आणि दिल्लीमध्ये केटरर्सची सर्वाधिक मागणी होती. टियर २ शहरांमध्ये जयपूर, लखनौ, कोईम्बतूर, चंदीगड आणि एर्नाकुलम ही केटरर्सना सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ शहरे होती.