नवी दिल्ली : रोमांचक गेमिंग अनुभवासाठी BRAVIA X75L टेलिव्हिजन सिरीज घरी आणा सोनी इंडिया ने आज 4K अल्ट्रा एचडी एलइडी डिस्प्लेसह नवीन BRAVIA X75L टेलिव्हिजन सिरीजची घोषणा केली. हे आधुनिक व पुढच्या पिढीचे उपकरण असून टेलिव्हीजन पाहण्याचा एक वैयक्तिकृत आणि जीवंत अनुभव देणारे म्हणून ओळखले जातील. X75L सह खऱ्या मनोरंजनाच्या जगात प्रवेश करा आणि रोमांचकारी खेळ, सुंदर रंगीत चित्रपट आणि स्पष्ट आणि नैसर्गिक आवाजासह अविश्वसनीय 4K स्पष्टतेचा अनुभव घ्या.
१ X1 4K प्रोसेसर आणि लाईव्ह कलर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुंदर रंग, काँट्रास्ट आणि बारीक सारिक तपशील अनुभवासोनीचे नवीन X75L टीव्ही सिरीज १०८ सेमी (४३ इंच), १२६ सेमी (५० इंच), १३९ सेमी (५५ इंच), १६४ सेमी (६५ इंच) मध्ये उपलब्ध आहे. नवीन X75L मध्ये X1 पिक्चर प्रोसेसरचा समावेश आहे. शक्तिशाली X1 प्रोसेसर आजूबाजूचे आवाज कमी करण्यासाठी आणि तपशील वाढवण्यासाठी प्रगत अल्गोरिदम वापरतो. अधिक जास्त स्पष्ट 4K सिग्नलमुळे तुम्ही जे काही पाहता ते 4K रिझोल्यूशनच्या जवळ आहे आणि लाइव्ह कलर तंत्रज्ञानाने समर्थित असल्याने हे अगदी जिवंतपणा खऱ्या वाटणाऱ्या रंगांनी परिपूर्ण आहे.
२ अधिक ज्वलंत आणि सहज पाहता यावे यासाठी X-Reality PRO आणि MotionflowTM XR सह अप्रतिम 4K चित्र गुणवत्तेचा अनुभव घ्या
नवीन BRAVIA X75L 4K टेलिव्हिजन्स तुम्हाला खऱ्या जगासारखे तपशील आणि पोत यांनी समृद्ध असे भव्य 4K पिक्चर पाहणे उपलब्ध करून देतात, ज्या प्रतिमा 2K मध्ये आणि पूर्ण एचडी मध्ये चित्रित केलेल्या आहेत त्यासुद्धा 4KX-RealityTM PRO द्वारे एक अनोखा 4K डेटाबेस वापरुन 4K रिझोल्यूशनच्या जवळ पर्यंत वाढवल्या जातात. तुम्ही MotionflowTM XR मुळे तुम्ही जलद गतीने चालणाऱ्या सिक्वेन्सेसचा सुद्धा सहजतेने आणि स्पष्ट तपशीलांसह आनंद घेऊ शकता. हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान मूळ फ्रेम्समध्ये अतिरिक्त फ्रेम्स तयार करून त्या घालते. हे लागोपाठ प्रेम्सवरील मुख्य व्हिज्युअल घटकांची तुलना करते आणि त्यानंतर सिक्वेन्सेसमधील गहाळ क्रियांच्या स्प्लिट सेकंदाची गणना करते. काही मॉडेल्समध्ये काळ्या रंगाचा देखील समावेश आहे.
३ प्रभावी बास आणि डॉल्बी ऑडिओ आणि क्लियर फेज तंत्रज्ञानामुळे शक्तिशाली व नैसर्गिक आवाजासह एका तल्लीन अनुभवाचा आनंद घ्या
BRAVIA X75L हे ओपन बॅफल डाऊन फायरिंग ट्विन स्पीकर्ससह येते; जे डॉल्बी ऑडिओ सह 20 वॅट एवढा शक्तिशाली आवाज देते. ओपन बॅफल डाऊन स्पीकर्स प्रभावी लो एंड ध्वनी देतात जे चित्रपट, खेळ आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. आता अजून जास्त स्पष्ट आणि नैसर्गिक आवाजाचा अनुभव घ्या आणि समृद्ध करणाऱ्या संगीतामध्ये स्वतःला तल्लीन करा. BRAVIA TM स्पीकरच्या प्रतिसादातील चुकांचे विश्लेषण आणि भरपाई करण्यासाठी क्लियर फेज तंत्रज्ञानासह शक्तिशाली असे संगणक मॉडेल वापरते. ते हे उच्च सुस्पष्टतेसह स्पीकर फ्रिक्वेन्सीचे ‘नमुने’ बनवून करते. स्पीकरच्या नैसर्गिक प्रतिसादामधील येणारे कोणतेही अति उंच किंवा एकदम खोल जाणारे ध्वनी (Peaks and dips) रद्द करण्यासाठी ही माहिती वापरली जाते; ज्यामुळे सर्व फ्रिक्वेन्सीजची समान निर्मिती होऊन शुद्ध, नैसर्गिक व स्वच्छ ध्वनी मिळतो.
४ X75L सिरीज गूगल टीव्हीसह स्मार्ट वापरकर्ता अनुभव देते, जी 700,000 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही सिरीजसह 10,000 हून अधिक अॅप्स आणि गेम्सद्वारे अखंड मनोरंजन देते. हे अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि होमकिट (HomeKit) बरोबर देखील हे सहजतेने व अखंड काम करते.
नवीन BRAVIA X75L सिरिजसह १०,००० हून जास्त अॅप्स डाउनलोड करा, ७००,००० पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही मालितसेच लाइव्ह टीव्ही हे सर्व एकाच ठिकाणी पहा. गूगल टीव्ही सर्व अॅप्स आणि सबस्क्रिपशन्समधून प्रत्येकाचे आवडते कन्टेंट आणते आणि त्यांना व्यवस्थापित करते. यामध्ये शोधणे सोपे आहे- फक्त गूगलला विचारा. अॅप्सवर शोधण्यासाठी “ओके गूगल, अॅक्शन चित्रपट शोध” असे म्हणून पहा. फोनवर वॉचलिस्ट जोडून ग्राहक वैयक्तिकृत शिफारसी आणि बुकमार्क शो व चित्रपट पाहण्यासाठी हवे ते सहज शोधू शकतात आणि ते टीव्हीवर पाहू शकतात व काय पहायचे आहे याचा मागोवा देखील ठेवू शकतात. वापरकर्ते त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपवरुन त्यांच्या वॉचलिस्टमध्ये गूगलसर्चद्वारे देखील जोडू शकतात आणि सर्व काही एकाच ठिकाणी शोधू शकतात. BRAVIA X75L अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि अॅपल होमकिट (HomeKit) ला देखील पूरक असल्याने सहजतेने कंटेंट प्रदर्शित व्हावे यासाठी ते टीव्हीसोबत आयपॅड आणि आयफोन्स सारख्या अॅपल च्या उपकरणांना अखंडपणे व सहज समाकलीत करते.
५ X75L हे PS5 साठी अशा वैशिष्ठ्यांसह येते; जे ऑटो HDR टोन मॅपिंग आणि ऑटो जेनर पिक्चर मोडसह तुमचा गेमिंग अनुभव बदलून टाकते. त्याची HDMI 2.1 सुसंगतता ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM) सह गेमिंगला समर्थन देते.
HDMI 2.1 मधील ऑटो लो लेटन्सी मोडमुळे X75L कन्सोल जोडले आणि चालू केले की ओळखते आणि आपोआप लो लेटन्सी मोडमध्ये बदलते. तुम्ही अधिक सहज, अधिक प्रतिसादात्मक गेम खेळण्याचा आनंद घ्याल, जे जलद गतीच्या आणि उच्च तीव्रतेच्या गेमसाठी अत्यावश्यक आहे. ऑटो एचडीआर टोन मॅपिंगसह तुमच्या PS5TM कन्सोलच्या सुरुवातीच्या सेटअप दरम्यान एचडीआर सेटिंग्ज झटपट ऑप्टिमाइझ केल्या जातील. तुमचे PS5TM आपोआप वैयक्तिक BRAVIA टीव्ही मॉडेल ओळखते आणि त्यानुसार तुमच्या टीव्हीसाठी सर्वोत्तम एचडीआर सेटिंग निवडते. त्यामुळे उच्च काँट्रास्ट दृश्यांमध्येसुद्धा तुम्हाला स्क्रीनच्या सर्वात उजळ आणि सर्वात गडद भागांमध्ये देखील महत्त्वपूर्ण तपशील आणि रंग दिसतील. इनपुट लॅग कमी करण्यासाठी आणि अॅक्शन अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी टीव्ही स्वयंचलितपणे गेम मोडमध्ये बदलेल. PlayStation5® कन्सोलवर चित्रपट पाहताना अधिक अभिव्यक्तिपूर्ण व बोलक्या दृश्यांसाठी पिक्चर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते पुन्हा स्टँडर्ड मोडमध्ये आपोआप येते.
६ ध्वनी सक्षम रिमोटने तुम्ही तुमचे आवडते कार्यक्रम आणि चित्रपट लावण्यासाठी टीव्ही बरोबर संवाद साधू शकता.
आवाज सक्षम रिमोट वापरुन तुमचे आवडते कन्टेंट पूर्वीपेख जलद शोधा. यामध्ये कठीण व किचकट नॅव्हिगेशन किंवा कंटाळवाणे टायपिंग करावे लागत नाही, तर तुम्ही केवळ विचारले पाहिजे. रिमोटमधील अंतर्भूत मायक्रोफोन्स दर्शकांना सोईस्कर अनुभव देतात. प्रेक्षक त्यांना काय हवे ते पटकन शोधण्यासाठी किंवा टीव्ही शो, चित्रपट व असे बरेच काही चालू करण्यासाठी गूगल असिस्टंट वापरुन टीव्हीबरोबर बोलू शकतात.
७ X75L सिरीज XR सुरक्षा PRO सह कठीण परिस्थितीत कार्य करण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
नवीन BRAVIA X75L सिरिज ही अधिकाधिक टिकून राहण्यासाठी नवीन आणि सुधारित X सुरक्षा PRO तंत्रज्ञानासह तयार केलेली आहे. ते केवळ धूळ आणि आर्द्रता संरक्षणासह सुसज्ज नाहीत तर ते सोनीच्या विजेच्या चाचण्यांच्या सर्वोच्च मानकांवर देखील खरे उतरतात. याचा अर्थ तुमचा टीव्ही विजेचा झटका आणि पॉवर सर्जपासून सुरक्षित आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या या टीव्हीसह अखंड मनोरंजनाचा आनंद घेत रहा.
८ X75L मध्ये अरुंद बेझेलसह मिनिमलिस्ट डिझाईन आहे आणि हे आकर्षक मनोरंजन प्रदान करण्यासाठी स्लिक स्मार्ट रिमोटसह येतो.
X75L चे मिनिमलिस्ट डिझाईन स्क्रीनला जास्तीतजस्ट वाढवते आणि बॅझेल कमीत कमी करते त्यामुळे तुम्ही जे महत्त्वाचे आहे म्हणजे पिक्चरवर लक्ष केंद्रित करू शकतात. हा एक असा टीव्ही आहे जो इमर्सिव्ह ध्वनीसाठी देखील डिझाईन केलेला आहेमग टीव्ही स्टँड वर ठेवलेला असो किंवा भिंतीवर लावलेला असो. या मध्ये बॅझेल अत्यंत अरुंद असल्यामुळे तुमचे डोळे नैसर्गिकरित्या पिक्चरवरच केंद्रित होतात, त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींवर नाही. स्लिमलाइन स्टँडची रचना टीव्हीशी पूर्णपणे जुळण्यासाठी आणि तुमच्या खोलीशी व त्याच्या सजावटीशी सुसंगत व्हावी म्हणून केली गेली आहे. मनोरंजनाच्या जगात डुबकी मारण्यासाठी आणि गेम्स मध्ये बुडून जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्हिडिओ ऑन डिमांड सेवा उपलब्ध व्हावे म्हणून X75L हे सहा हॉट कीज् (नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्नी + हॉटस्टार, सोनी लिव, यू ट्यूब व्हिडिओ आणि संगीत) सह लहान आणि वापरण्यास सोप्या रिमोट कंट्रोलसह येते.