रेनॉ इंडियाने पुण्‍यातील श्रीमती कविता श्रीकांत जाधव यांना पहिली बीएस-६ स्‍टेप २ प्रमाणित कायगर एएमटी डिलिव्‍हर केली

34

पुणे, जून १०, २०२३ : रेनॉ इंडिया या भारतातील आघाडीच्‍या युरोपियन ब्रॅण्‍डला पुण्‍यामध्‍ये बीएस-६ स्‍टेप २ सह प्रमाणित रेनॉ कायगर एएमटीच्‍या पहिल्‍या डिलिव्‍हरीची घोषणा करताना आनंद होत आहे. श्रीमती कविता श्रीकांत जाधव पहिल्‍या सुधारित रेनॉ कायगर एएमटीच्‍या अभिमानी मालक बनल्‍या आहेत. पीपीएस पुणे डिलरशिप येथे डिलिव्‍हरी करण्‍यात आली, जो रेनॉ इंडियासाठी महाराष्‍ट्र राज्‍यातील लक्षणीय टप्‍पा ठरला. सुधारित दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्ये असलेल्‍या रेनॉ कायगर एएमटी श्रेणीची किंमत ८.४७ लाख रूपये एक्‍स-शोरूम दिल्‍ली या किंमतीपासून सुरू होते.

ह्युमन फर्स्‍ट प्रोग्रामचा भाग महणून रेनॉ कायगरची संपूर्ण श्रेणी नाविन्‍यपूर्ण व प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह येते. हा प्रोग्राम अपघातांचा धोका कमी करण्‍यासाठी आणि प्रवासी व पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या प्रोग्रामचा भाग म्‍हणून रेनॉने भारतातील आपल्‍या सर्व उत्‍पादन श्रेणीमध्‍ये नवीन व सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये अपग्रेड व सादर केली आहेत, जी अपघातांचा धोका कमी करण्‍यासाठी आणि एकूण सुरक्षिततेत सुधारणा करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ह्युमन फर्स्‍ट प्रोग्राम अंतर्गत रेनॉ इंडियाच्‍या उत्‍पादन लाइन-अपमध्‍ये नवोन्‍मेष्‍कारी व दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, जसे हौशी व अनुभवी ड्रायव्‍हर्सच्‍या गरजांची पूर्तता करत वळणदार रस्त्‍यांवरील सुधारित नियंत्रणासाठी इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), हिल स्‍टार्ट असिस्‍ट (एचएसए), जे कार चढण रस्‍त्‍यावर प्रवास करत असताना ब्रेक लावल्‍यास मागे जाण्‍याला प्रतिबंध करते, ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम (टीसीएस), जे चाकाच्‍या गतीमधील अनियमितता ओळखते, निसरड्या रस्‍त्‍यांवर ग्रिप ठेवण्‍यासाठी आपोआपपणे स्पिन्‍स कमी करते व अपघातांना प्रतिबंध करते आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (टीपीएमएस), जे कारच्‍या टायर्समधील दाब कमी झाल्‍यास किंवा टायर्स पंक्‍चर झाल्‍यास रिअल-टाइम अलर्टस् देते.

फ्रान्‍स व भारतातील डिझाइन टीम्‍समधील सहयोगाचा परिणाम असलेली रेनॉ कायगर भारताला रेनॉच्‍या अव्‍वल पाच जागतिक बाजारपेठांत समाविष्‍ट करण्‍यामध्‍ये साह्यभूत आहे. जागतिक दर्जाचे १.० लीटर टर्बो पेट्रोल व १.० लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनची शक्‍ती असलेली रेनॉ कायगर एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी व ५ स्‍पीड ईजी-आर एएमटी ट्रान्‍समिशनसह सुधारित ड्रायव्हिंग अनुभव आणि आरामदायीपणा देते. रेनॉ कायगर किफायतशीर मेन्‍टेनन्‍ससह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागातील सर्वात परवडणारी ऑफरिंग आहे. कायगर अधिक कार्यक्षमता व स्‍पोर्टी ड्राइव्‍ह देते, तसेच या वेईकलमध्‍ये २०.६२ किमी/लिटरची बेस्‍ट-इन-सेगमेंट इंधन कार्यक्षमता आहे.

रेनॉ कायगरला अग्रगण्‍य जागतिक कार मूल्‍यांकन उपक्रम ग्‍लोबल एनसीएपीने अडल्‍ट प्रवाशी सुरक्षिततेसाठी ४-स्‍टार सेफ्टी रेटिंगसह पुरस्‍कारित केले आहे. ड्रायव्‍हर व पुढील आसनावरील प्रवाशाच्‍या सुरक्षिततेसाठी रेनॉ कायगरमध्‍ये फ्रण्‍ट व साइडला चार एअरबॅग्‍ज, प्री-टेन्‍शनरसह सीटबेल्‍ट्स व लोड-लिमिटर (ड्रायव्‍हर प्रवासीसाठी) आहे.
रेनॉ इंडिया बीएस-६ स्‍टेप २ प्रमाणित कायगर एएमटी श्रेणीच्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात करत असताना कंपनी भारतीय ग्राहकांना सुरक्षिततेचे सर्वोच्‍च जागतिक मानक देणारी उत्‍पादने प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. रेनॉने भारतभरात ९,००,००० हून अधिक समाधानी ग्राहक असण्‍याचा लक्षणीय टप्‍पा संपादित केला आहे.

स्‍पोर्टी, स्‍मार्ट व आकर्षक रेनॉ कायगरचे मालक होऊ पाहणारे ग्राहक महाराष्‍ट्रात असलेल्‍या अधिकृत रेनॉ डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून कार बुक करू शकतात, ज्‍यामधून एकसंधी व विनासायास अनुभवाची खात्री मिळते.