रेनॉ इंडियाकडून कायगरची सुधारित श्रेणी लाँच

77

नवी दिल्‍ली : रेनॉ या भारतातील आघाडीच्‍या युरोपियन ब्रॅण्‍डने सुधारित मूल्‍य तत्त्वासह कायगरचा व्‍हेरिएण्‍ट पोर्टफोलिओ सुधारित केला आहे, ज्‍याअंतर्गत ७.९९ लाख रूपये या आकर्षक किंमतीत कायगर आरएक्‍सटी (ओ) एमटी व्‍हेरिएण्‍ट सादर करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ८ इंच टचस्क्रिनसह वायरलेस कनेक्‍टीव्‍हीटी, एलईडी हेड लॅम्‍प्‍स, अलॉई व्‍हील्‍स व हाय सेंटर कंसोल आणि या सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांमधून सुधारित ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. कंपनीने आरएक्‍सझेड व्‍हर्जनवर आतापर्यंतच्‍या सर्वोत्तम ऑफर्स देखील लाँच केल्‍या आहेत, ज्‍यामध्‍ये १०,००० रूपयांपर्यंत रोख, एक्‍स्‍चेंजअंतर्गत २०,००० रूपये, जवळपास १२,००० रूपयांचे कॉर्पोरेट बेनीफिट्स आणि जवहपास ४९,००० रूपयांचे लॉयल्‍टी बेनीफिट्स अशा लाभांचा समावेश आहे. 

रेनॉ इंडिया ऑपरेशन्‍सचे कंट्री सीईओ व व्‍यवस्‍थापकीय संचालक वेंकटराम मामिलपल्‍ले म्‍हणाले, ‘‘रेनॉ इंडिया ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करणारी जागतिक दर्जाची उत्‍पादने व सेवा वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. रेनॉ कायगरच्‍या सुधारित श्रेणीच्‍या सादरीकरणासह आम्‍हाला ग्राहकांना स्‍टाइल, कार्यक्षमतेसह सुरक्षिततेचे परिपूर्ण संयोजन देताना आनंद होत आहे. मानव केंद्रित उपक्रमाप्रती आमच्‍या जागतिक कटिबद्धतेचा भाग म्‍हणून आम्‍ही नेक्‍स्‍ट जनरेशन टेक्‍नॉलॉजीचे लोकशाहीकरण करत आमची उत्‍पादन पोहोच वाढवण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. म्‍हणून आम्‍ही कायगरची किंमत स्‍पर्धात्‍मक असण्‍यासोबत सुरक्षितता, दर्जा व वैशिष्‍ट्यांच्‍या संदर्भात सुधारित मूल्‍यासह सुसज्‍ज असण्‍याची खात्री घेतली आहे. तसेच आम्‍ही ग्राहकांचा मालकीहक्‍क अनुभव अधिक आनंददायी करण्‍यासाठी आकर्षक ऑफर्स व आर्थिक पर्याय देखील सादर केले आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, रेनॉ कायगरची नवीन सुधारित श्रेणी ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करेल आणि ऑटोमोटिव्‍ह उद्योगातील विश्‍वसनीय ब्रॅण्‍ड म्‍हणून आमच्‍या स्‍थानाला अधिक दृढ करेल.’’

रेनॉ कायगर पोर्टफोलिओमध्‍ये आता नवोन्‍मेष्‍कारी व दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, ही वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:-    

  • इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) – वळणदार रस्‍ते हौशी ड्रायव्‍हरच्‍या कौशल्‍यांची चाचणी घेऊ शकतात आणि अनुभवी ड्रायव्‍हर्सना देखील आव्‍हान करू शकतात. वळणदार रस्‍त्‍यांवर प्रवास करताना कारला स्थिर ठेवण्‍यासाठी रेनॉ कायगर श्रेणी इन-बिल्‍ट इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्रामसह येते. हे वैशिष्‍ट्य राइडिंग दिशेवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करते आणि रोलओव्‍हर्स किंवा अपघातांना प्रतिबंध करते.  
  • हिल स्‍टार्ट असिस्‍ट (एचएसए) – रेनॉ कायगरमधील हे वैशिष्‍ट्य तुम्‍ही थांबल्‍यानंतर चढण रस्‍त्‍यावर जाताना ब्रेक्‍स सोडता तेव्‍हा कारला मागे जाण्‍यापासून प्रतिबंध करते.
  • ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम (टीसीएस) – रस्‍त्‍यांवरील निसरडे भाग हे अपघात स्‍थळ असतात आणि अशा भागांवर गाडी घसरणे स्‍वाभाविक आहे. हे पाहता ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम अनियमित चाकाचा वेग ओळखून आणि रस्त्यावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी आपोआप स्पिन कमी करून अद्वितीय काम करते. 
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (टीपीएमएस) – कायगर श्रेणीमधील टायर प्रेशर मॉनिटर्स कारच्‍या टायर्समधील हवेचा दाब कमी असल्‍यास रिअल-टाइममध्‍ये त्‍याबाबत अलर्ट देतात.  

फ्रान्‍स व भारतातील डिझाइन टीम्‍समधील सहयोगाची परिणाम असलेली रेनॉ कायगर भारताला रेनॉच्‍या अव्‍वल पाच जागतिक बाजारपेठांत समाविष्‍ट करण्‍यामध्‍ये साह्यभूत आहे. जागतिक दर्जाचे १.० लीटर टर्बो पेट्रोल व १.० लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनची शक्‍ती असलेली रेनॉ कायगर एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी व ५ स्‍पीड ईजी-आर एएमटी ट्रान्‍समिशनसह सुधारित ड्रायव्हिंग अनुभव आणि आरामदायीपणा देते. रेनॉ कायगर किफायतशीर मेन्‍टेनन्‍ससह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागातील सर्वात परवडणारी ऑफरिंग आहे. रेनॉ कायगरला कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये अनेक पुरस्‍कारांसह सन्‍मानित करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून भारतीय बाजारपेठेतील या वेईकलचे यश दिसून येते. जागतिक दर्जाचे टर्बोचार्ज्‍ड १.० लीटर पेट्रोल इंजिनची शक्‍ती असलेली ही वेईकल अधिक कार्यक्षमता व स्‍पोर्टी ड्राइव्‍ह देते, तसेच या वेईकलमध्‍ये २०.६० किमी/लीटरची बेस्‍ट-इन-सेगमेंट इंधन कार्यक्षमता आहे.

रेनॉ कायगरला अग्रगण्‍य जागतिक कार मूल्‍यांकन उपकम ग्‍लोबल एनसीएपीने अडल्‍ट प्रवाशी सुरक्षिततेसाठी ४-स्‍टार सेफ्टी रेटिंगसह पुरस्‍कारित केले आहे. ड्रायव्‍हर व पुढील आसनावरील प्रवाशाच्‍या सुरक्षिततेसाठी रेनॉ कायगरमध्‍ये फ्रण्‍ट व साइडला चार एअरबॅग्‍ज, प्री-टेन्‍शनरसह सीटबेल्‍ट्स व लोड-लिमिटर (ड्रायव्‍हर प्रवासीसाठी) आहे. तसेच रेनॉ कायगरमध्‍ये इम्‍पॅक्‍ट सेन्सिंग डोअर अनलॉक, स्‍पीड सेन्सिंग डोअर लॉक, ६०/४० स्प्लिट रिअर रो सीटसह अॅडजस्‍टेबल हेडरेस्‍ट्स आणि चाइल्‍ड सीटसाठी आयएसओफिक्‍स अँकरेज आहे. 

रेनॉ कायगरला किमान १० पुरस्‍कार मिळाले आहे, ज्‍यामध्‍ये प्रतिष्ठित ऑटोकार इंडिया कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही ऑफ द इअर २०२२, सीॲण्‍डबी सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही ऑफ द इअर २०२२ आणि टॉपगिअर कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही ऑफ द इअर २०२२ या पुरस्‍कारांचा समावेश आहे.