रुबी हॉल क्लिनिक मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिका जागर सप्ताह

47

पुणे : रूबी हॉल क्लिनिकने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त (१२ मे) रूग्णालयाच्या परिचारिकांच्या अथक परिश्रमांचे कौतुक करण्यासाठी आणि दररोज रुग्णांचे जीवन वाचवण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याने ते साजरे करण्यासाठी मजेदार कार्यक्रमांनी भरलेला परिचारिका सप्ताह आयोजित केला. परिचारिकाना बर्‍याचदा कामाचा प्रचंड ताण आणि अनियमित दीर्घकाळ सतत काम करावे लागते, त्यामुळे त्यांना कामाचे सकारात्मक वातावरण आणि त्यांच्या सेवेचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे, ‘आपल्या परिचारिका, आपले भविष्य’ या थीमसह उत्सव सप्ताह, ८ मे रोजी सुरू झाला आणि १२ तारखेपर्यंत अनेक उपक्रमांसह चालू होता.  आरोग्य सेवा सर्वांसाठी, “आपल्या परिचारिका, आपले भविष्य’ या शीर्षकाचे एक अनोखे स्किट, फेस पेंटिंग सत्र ज्यामध्ये अनेक परिचारिकांनी सहभाग घेतला, एक म्युझिक जॅम सेशन ज्यामध्ये प्रसिद्ध फर्टाडोस म्युझिकचा समावेश होता. इतर सांस्कृतिक उपक्रम जसे की गायन, नृत्य आणि माइम परफॉर्मन्स,केशरचना स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासारख्या  परिचारिकांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणाऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

परिचारिका दिनानिमित्त  परिचारिकांचा आनंदोत्सव आणि सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले गेले.  कॅथलॅबचे सह-संचालक आणि प्रभारी डॉ सीएन माखा ले इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून ह्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ डॉक्टर पीके ग्रँट, मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि हॉस्पिटलमधील कार्डिओव्हस्कुलर सर्व्हिसेसचे अध्यक्ष, या उत्सवाविषयी बोलताना म्हणाले, “आमच्या संस्थेच्या महत्वाच्या स्तंभांना, आमच्या परिचारिकांप्रति कृतज्ञता व्यक्त  करणे हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण होता. त्यांना विविध उपक्रमांचा आनंद घेताना पाहून आम्हाला देखील आणखी आनंद झाला.”

या सर्व उपक्रमांमागे सुश्री नीलाक्षी श्रीवास्तव, रुग्णालयातील नर्सिंग सर्व्हिसेसच्या संचालिका यांची संकल्पना होती आणि त्याबद्दल परिचारिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. ह्या आठवड्याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा केवळ आपल्या व्यवसायाची ओळख करून देण्याचा दिवस नाही, तर जगभरातील सर्व अविश्वसनीय परिचारिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक क्षण आहे. माझ्या नर्सिंग सहकाऱ्यांची लवचिकता आणि कामाप्रती समर्पण मला दररोज प्रेरित करते. आमच्या आरोग्य सेवा प्रणालीचा कणा असल्याबद्दल आणि अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. या आठवड्याचे सर्व कार्यक्रम त्यांना लक्षात घेऊन आखण्यात आले होते, जेणेकरून त्यांचा उत्साह उंचावला जाईल आणि त्यांना ताजेतवाने वाटेल.”