रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने आज उडान या रिटेलर्स व लहान किराणा स्टोअर्ससाठी भारतातील सर्वात मोठ्या ईबी२बी व्यासपीठावर आयकॉनिक बेव्हरेज ब्रॅण्ड ‘कॅम्पा’ फ्लेवर्सच्या उपलब्धतेसाठी भारतभरातील वितरण सहयोगाची घोषणा केली. ही श्रेणी रिटेलर्स व लहान किराणा स्टोअर्ससाठी उडान व्यासपीठावर उपलब्ध असणार आहे. सुरूवातीला आरसीपीएलची कॅम्पा पेयांची श्रेणी ५०,००० हून अधिक रिटेलर्स / किराणा स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. हे वितरण कव्हरेज हळूहळू पुढील दोन महिन्यांमध्ये १ लाखाहून अधिक रिटेलर्स / किराणा स्टोअर्सपर्यंत विस्तारित होईल.
उडान व्यासपीठावर लाँच करण्यात आलेल्या तीन नवीन कॅम्पा फ्लेवर्स – कोला, ऑरेंज व क्लीअर लाइम विविध वापर रेंजेस् व किंमतीत उपलब्ध असतील, ज्यामध्ये त्वरित वापरासाठी २०० मिली पॅक, ५०० मिली ऑन-द-गो शेअरिंग पॅक्स आणि अधिक वापरासाठी २,००० मिली होम पॅक्सचा समावेश असेल.
व्यासपीठावर कॅम्पा फ्लेवर्सच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने उडान विस्तारीकरणाला चालना देण्याकरिता आणि व्यासपीठावरील ग्राहकवर्गामध्ये वाढ करण्यासाठी विविध रिटेलर प्रमोशन्सवर काम करेल.
उडानने नुकतेच त्यांचा ग्रामीण उपक्रम ‘प्रोजेक्ट विस्तार’ लॉन्च केला. या उपक्रमाचा भारताकडून प्रदान करण्यात आलेल्या व्यापक संधीचा लाभ घेत फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गूड्स (एफएमसीजी) व फूड कॅटेगरीचा विस्तार व विकास करण्याचा मनसुबा आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून उडान जवळपास ३००० लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ग्रामीण बाजारपेठेला सेवा देत आहे. सध्या ग्रामीण उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे आणि दहा जिल्ह्यांमधील १५,००० हून अधिक रिटेलर्सपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचा पुढील १० ते १२ महिन्यांमध्ये १०,००० हून अधिक शहरे व गावांपर्यंत आपली पोहोच विस्तारित करण्याचा मनसुबा आहे. प्रोजेक्ट विस्तार शहरी व ग्रामीण भागांमधील तफावत दूर करण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे आणि उडानच्या व्यापक किराणा नेटवर्कचा लाभ घेत एफएमसीजी ब्रॅण्ड्सची व्यापक श्रेणी ग्रामीण लोकांना उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.
उडानच्या एफएमसीजी व्यवसायाचे प्रमुख विनय श्रीवास्तव म्हणाले, ‘‘आम्ही यंदा उन्हाळ्यामध्ये भारतीय ग्राहकांसाठी ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ सादर करण्यास आणि उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहोत. आमचा विश्वास आहे की, आमच्या व्यापक रिटेलरवर्गासह किफायतशीर वितरण नेटवर्क आम्हाला भारतभरात ‘कॅम्पा’ फ्लेवर्ससाठी सखोल बाजारपेठ प्रवेश निर्माण करण्याकरिता आरसीपीएलच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अद्वितीय स्थानावर नेतात.’’
‘‘विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक ब्रॅण्ड्सना उडानच्या विस्तृत वितरण नेटवर्कचा फायदा झाला आहे, ज्यामुळे ब्रॅण्ड्सना राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये महत्त्वपूर्ण किमतीच्या फायद्यांसह अधिक जलद प्रवेश मिळतो. रिटेलर्स व लहान किराणा स्टोअर्सना सेवा देण्याच्या प्रयत्नात उडान आपली क्षमता वाढवत राहील आणि संपूर्ण भारतामध्ये व्यवसाय वाढवू पाहणाऱ्या ब्रॅण्ड्ससाठी पसंतीचा भागीदार बनण्याच्या दिशेने काम करेल,’’ ते पुढे म्हणाले.
उडानने आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या उद्देशाने क्षमतांना गती देण्यासाठी व प्रबळ करण्यासाठी तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, श्रेणी, क्रेडिट, कर्मचारी आणि अनुपालन यांसह व्यवसायाच्या विविध स्तंभांमध्ये गुंतवणूक केली आहे. सखोल ग्राहक विश्लेषणाचा फायदा घेऊन आणि अॅपची गती सुधारून एकूण ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी कंपनीने विविध उपक्रम देखील हाती घेतले आहेत.
कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये, उडानने ८९ टक्क्यांपेक्षा जास्त रिपीट खरेदी दरासह अत्यावश्यक श्रेणीत मोठी वाढ पाहिली, ज्यामुळे त्यांचे भागीदारांशी असलेले मजबूत संबंध ठळकपणे दिसून आले. या व्यतिरिक्त १.५ लाख टनांहून अधिक एफएमसीजी उत्पादने उडानद्वारे पाठवण्यात आली, या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून येत आहेत.