पुणे, १६ डिसेंबर २०२२ : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये सान्वी क्षेत्रीला अकरा वर्षाखालील गटात पुमसे प्रकारात सुवर्णपदक मिळाले. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजिली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मणिपूर व इतर राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सान्वी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इयत्ता ५ वी मध्ये शिकत आहे. सान्वीच्या या यशाबद्दल शाळेकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.
सान्वी तिचे वडील आणि प्रशिक्षक सिद्धू क्षेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सिद्धू क्षेत्री स्वतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्डर ऑन गेल्या २० वर्षांपासून ते होरांगी तायक्वांदो अकॅडमीमध्ये सराव करत आहेत. सान्वीची आई मृणाल याही रोप मल्लखांब खेळाडू आहेत. घरातून आणि शाळेतून सान्वीला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत असल्याने तिचा खेळ बहरत आहे.