राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पुणे जिल्हा सरचिटणीसपदी विशाल तुळवे यांची फेरनिवड

16
Vishal-Tulve
पुणे, ता. ११ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पुणे जिल्हा सरचिटणीसपदी विशाल तुळवे यांची फेरनिवड करण्यात आली. राज्याचे उपमुखमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा नुकताच झाला. प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुनील तटकरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र आणि आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीमध्ये तटकरे यांच्या हस्ते विशाल तुळवे यांनी जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्याचे पत्र स्वीकारले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.
खेड तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह प्रदेश स्तरावरील, जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आभार मानतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणखी जोमाने काम  करणार असल्याचे विशाल तुळवे यांनी सांगितले.