राम गोपाल वर्मा यांनी केले महेश बाबू यांच्या अभिनयाचे कौतुक

304

मुंबई- आपण राम गोपाल वर्मा यांना ट्विटरवर नेहमी सनसनीत ट्विट करताना बघितले असेल पण यंदा त्यांनी साउथचे सुपरस्टार महेश बाबू यांच्या अभिनयाचे भरभरुन कौतुक केले आहे. वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर महेश बाबू हे बाल कलाकार असताना त्यांच्या बाझार राउडी या चित्रपटाचा छोटा व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये महेश बाबू भरपूर आत्मविश्वासाने अभिनेत्री नादीया यांना आपला परिचय देत आहे. नादीयाने या चित्रपटात पत्रकाराची भुमिका साकारली होती. या व्हिडिओतून महेश बाबू हे लहान वयातच अभिनयात पारांगत असल्याचे दिसते आहे. आकर्षक व्यक्तिमत्वासह कुशाग्र बुद्धी असलेले महेश बाबू हे जन्मत: कलाकार असल्याचे वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडिओ महेश बाबू यांचे वडील अभिनेता कृष्णा यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसाआड पोस्ट केलायं. सध्या महेश बाबु यांचा प्रदर्शित झालेल्या ‘महर्शी’ हा चित्रपट थियटरमध्ये धुमाकूळ घालत आहे, आणि आता ते त्यांच्या पुढिल चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. अधिकृतपणे या चित्रपटाचे नाव येत्या काही दिवसात कळणार आहे.