राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि एनपावर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विकास घडविणाऱा उपक्रम

88

पुणे, ९ मार्च २०२३ : महाराष्ट्र राज्यात शालेय मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविणाऱ्या उपक्रमाचा प्रायोगिक टप्प्याची आज पुणे येथे यशस्वी सांगता झाली. पालघर, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यातील ४० आदर्श शाळांमध्ये हा उपक्रम राबविल्या नंतर पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ४८८ आदर्श शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याची तयारी सुरु झाली आहे.

ऑक्टोबर २०२२ पासून महाराष्ट्रातील ४० आदर्श शाळांमध्ये स्वजीवी महाराष्ट्र नावाचा एक पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला.  शिक्षण आयुक्त डॉ. सूरज मांढरे यांच्या मान्यतेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि एनपावर या संस्थामध्ये अधिकृत सामंजस्य करार झाला व उपक्रमाची सुरवात झाली. 

स्वजीवी महाराष्ट्र अंतर्गत ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील इयत्ता ६वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेची मानसिकता घडवण्याचे शिक्षण दिले गेले. विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण शैलीद्वारे उद्योजकांच्या मानसिकतेची ओळख करून देणे हे या उपक्रमाचे ध्येय होते. विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आपल्या सभोवतालच्या समस्या ओळखून त्यावर मात करण्यासाठी कल्पक उपाय शोधले व त्यामधून सेवा व उत्पादनांची निर्मिती देखील केली.

एनपावरचे संस्थापक सुशील मुणगेकर यांनी स्वतः आदर्श शाळेच्या निवडक शिक्षकांना या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले. शिक्षकांनी स्वजीवी प्रतिनिधीच्या सहाय्याने तीन महिने अथक परिश्रम घेत मुलांना समस्या ओळखणे, समस्या सोडवणे, ग्राहक-केंद्रित समाधान निर्मिती अशा संकल्पना आकर्षक कथा व बोधयुक्त खेळ यातून शिकविल्या. मुख्यतः हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करण्यात आला व त्याची अंमलबजावणी देखील मराठी भाषेतच करण्यात आली.

प्रत्येक शाळेतून निवडक उद्योजकीय कल्पना जिल्हा स्तरावर – ‘स्वजीवी तेजांकित – २०२३’ सोहळ्यात सादर केल्या गेल्या. पुणे, ठाणे आणि पालघर येथे  जिल्हानिहाय उपांत्य फेरी सोहळा रंगला. तीनही जिल्ह्यातून निवडून आलेल्या प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट कल्पना राज्य स्तरावर ‘