राज्यपालांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया ‘सीएसआर अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित

77
राज्यपालांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया 'सीएसआर अवॉर्ड-२०२३'ने सन्मानित

पुणे : राज्यपालांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया ‘सीएसआर अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन आणि बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, हिंदुजा ग्रुपचे शोम हिंदुजा आदी उपस्थित होते. सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्योग व सामाजिक क्षेत्रातील २०० पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.

 समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच २००० पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी ‘लर्न व्हईल अर्न’ अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व सांगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. नीरजा बिर्ला, बजाज फाउंडेशनचे अपूर्व बजाज, गोदरेंज इंडस्ट्रीजचे नादीर गोदरेज, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचे विजय गुरुनानी, सुदर्शन केमिकल्सचे राजेश राठी, यांच्यासह भारतीय आयुर्विमा मंडळ, महिंद्रा ग्रुप, घोडावत ग्रुप, मालपाणी ग्रुप, कोहिनुर ग्रुप आदी संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.