रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे चिपळूण पोलिस महिला कर्मचारी यांचा सन्मान

108

चिपळूण : विलास गुरव

रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन  अध्यक्षा सौ. रंजिता ओतारी ह्या गेली ५ वर्षे विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत तेच लक्षात घेवुन चिपळूण मध्ये  महिला पोलिस कर्मचारी व अधिकारी अहोरात्र सेवेद्वारे जनतेला सुरक्षीत ठेवण्यास मदत करणाऱ्या पोलीस स्टेशन मधील माझ्या सर्व भगिनींचा मला सार्थ अभिमान आहे.

त्यांची निःस्वार्थ आणि अविरत सेवा आज समाजासाठी आणि माझ्यासारख्या अनेक महिलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाची गरज आहे. त्याच सामाजिक जाणीवेचं भान ठेवत आणि त्यांना मान देण्याच्या हेतूने पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी, अधिकारी भगिनींसाठी रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे दि.२८/०१/२०२३  रोजी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.

तसेच सौ.वंदना कानोजा,सौ.रेखा पवार, सुकन्या आंबेकर,आरती चव्हाण, सुप्रिया मोरे,वेदा मोरे,समीक्षा बोले  व  महिला पोलिस  पत्नी यांचाही समावेश होता. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजिता ओतारी,सदस्या सौ. दिप्ती सावंत देसाई, सौ.अश्विनी ताम्हणकर, सौ.शिल्पा बुरटे उपस्थित होते.

हेही वाचा

आता पुण्यात पोलिसांकडूनच घ्या पैसे; ५ हजार ते १० हजार कमावता येणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण