रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे भव्य हळदीकुंकू समारंभ

102

चिपळूण : विलास गुरव

चिपळूण शहरातील बचत गट,DAY-NULM अभियान चिपळूण नगरपरिषद अंतर्गत नवनिर्मिती शहर स्तर संघ या संघातील दहा वस्ती स्तर संघ. विघ्नहर्ता वस्ती तर संघ,उक्ताड, जय मल्हार वस्ती तर संघ, पागमळा, एकता वस्ती तर संघ,पेठमाप गणेश वाडी,कालिका माता वस्ती तर संघ,पेठमाप तांबटआळी,धनलक्ष्मी वस्ती तर संघ, गोवळकोट,जीवन ज्योती वस्ती तर संघ,काविळ तळी, वस्ती स्तर संघ,ओतारी गल्ली, तुळजा भवानी वस्ती स्तर संघ,गांधी नगर, दुर्गामाता वस्ती स्तर संघ,गांधी नगर, आराध्य वस्ती स्तर संघ, खेंडया संघांना रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे भव्य हळदीकुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच शहरातून शहीद जवानांच्या पत्नी, ज्या महिलांच सौभाग्य नाही. अश्या महिलांना हळदी कुंकू वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व करणाऱ्या कुमारीका अशा साऱ्यांना एकाच छताखाली घेऊन रंजीता चॅरिटेबल फाउंडेशने आगळा -वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.

महिलांसाठी यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेता स्पर्धकांना फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजीता ओतारी यांच्या हस्ते प्रथम क्रमांक सोन्याची नथ मानकरी सौ.सुचिता जाधव ठरल्या तर द्वितीय क्रमांक चांदीचे पैंजण, सौ.मेघा जाधव यांना देण्यात आला.चांदीच्या जोडव्या.सुरेखा इंगावले यांना देऊन सन्मान करण्यात आला.

शहरातील खेडेकर क्रीडा संकुल या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.

१८०० हुन अधिक महिलांनी हळदीकुंकू चा लाभ घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सौ.समिधा योगेश बांडागळे,सौ.ऋतुजा राजेंद्र शिंदे.सौ.आस्मा शाहिद खेरटकर.सौ निकहत निसार शेख सौ.स्वरा सावंत,ॲड स्मिता कदम.डॉ.कांचन मदार,सौ रविना गुजर, DAY-NULM विभाग चिपळूण व्यवस्थापक श्री.अश्फाक गारदी सर, DAY-NULM विभाग चिपळूण समुदायक संघटक प्रज्ञा गद्रे,( माविम) अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र खेड विभाग चिपळूण क्षेत्रीय समन्वयक सौ.दिक्षा माने,व सहयोगिनी भारती विचारे अश्या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजिता विजय ओतारी.सदस्या सौ वनीता उत्तम काशिद,सौ दिप्ती सुनिल सावंत देसाई,सौ अश्विनी अमोल ताम्हणकर,सौ शिल्पा शैलेश बुरटे,निलेश आवले.उपस्थित होते.

हेही वाचा

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश