यूएससी ‍विटेरबी स्कूल ऑफ इंजिनियरींगचे डीन यान्नीस योर्तोसॉस यांचे भारतात पुनरागमन- उच्च स्तरीय शिष्टमंडळाच्या भेटीसह महामारी नंतरची पहिलीच भेट

52

पुणे, ९ डिसेंबर २०२२ : विटरेबी स्कूल ऑफ इंजिनियरींग या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (यूएससी) शी संलग्न असलेल्या स्कूल चे डिन यान्नीस योर्तोसॉस हे तीन दिवसीय व्यावसायिक आणि शैक्षणिक मिशनवर भारतात आले आहेत. २०१९ च्या महामारी नंतरची त्यांची ही पहिली भारत भेट आहे.  डीन योर्तोसॉस हे अतिशय नामांकित अशा इंजिरियरींग स्कूल्स मधील अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.  त्याच बरोबर ते भारतातील आघाडीचे व्यावसायिक व प्रतिथश अशा माजी विद्यार्थी आणि प्रस्तावित विद्यार्थ्यां बरोबर संवाद साधण्याची आपली परंपरा सुरु ठेवणार आहेत.  त्याच बरोबर स्कूल तर्फे वार्षिक अशा भारतीय ॲक्सिलॉर व्हेंचर्ससह भाषणांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये स्टार्ट अप्स आणि भविष्यातील व्यावसायिकांमधील नाविन्यावर चर्चा करणार आहेत.

सध्या १३ हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी या स्कूल मध्ये प्रवेश घेतला असून यूएससी ही अमेरिकेतील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्‍या संस्थांपैकी एक आहे.  विशेष करुन भारतातील २,५९० ( एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी २० टक्के) विद्यार्थी असून ही संख्या फॉल २०१९ म्हणजेच महामारी पूर्वी ३१.५ टक्क्यांनी वाढलेली आहे.  नमूद करण्याची गोष्ट अशी की विटरेबी स्कूल ऑफ इंजिनियरींग मध्ये जवळजवळ २००० भारतीय विद्यार्थी आहेत, म्हणजेच वैविध्यपूर्ण कॅम्पसेस मध्ये सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे.

यूएससी विटरेबी स्कूल ऑफ इंजिनियरींग च्या जागतिक शैक्षणिक उपक्रमाचे डीन योर्तोसॉस यांच्या सह डॉ.कौलिगी ‘रघू’ राघवेंद्र आणि वरिष्ठ असोसिएट डीन फॉर ॲडमिशन ॲन्ड स्टूडंट एंगेजमेंट, केली गुलिस यांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे.

भारतातील आगमना विषयी बोलतांना डीन योत्रोसॉस म्हणाले “नाविन्य क्षेत्रातील आमच्या भारतीय वैयक्तिक स्तरावर भेटणे माझ्यासाठी उत्साहाची गोष्ट आहे.  आंम्हाला आशा आहे की आम्ही आमची ही भागीदारी आघाडीचे तज्ञ, इंजिनियरींग शिक्षक आणि संशोधकां बरोबर सुरु ठेऊ, कारण जगातील सर्वांत मोठे आव्हान हे एक देश, एक विद्यापीठ किंवा एका व्यक्तीपेक्षा खूप मोठे असते.  त्याच बरोबर आम्ही येत्या काही वर्षांत आम्ही हे शिकलो की आरोग्य आणि शाश्वत अशा समस्यांसाठी कोणतीही सीमा रेषा नसते आणि त्यासाठी आपण एकत्र येऊन त्यांचा सामना करावा लागतो.”

२१ व्या शतकातील इंजिनियर्स ची पुर्नरचना करण्यासाठी ग्रॅन्ड चॅलेंज स्कॉलर्स प्रोग्राम (जीसीएसपी) चा एकत्रित विकास करणार्‍या डीन योत्रासॉस यांची आवड म्हणजे जगाभरांतील मोठ्या आव्हानांचा मुकाबला करणे.  मे २०२२ मध्ये डीन योत्रोसॉस यांना यूएस नॅशनल ॲकेडमी ऑफ इंजिनियरींग कडून गॉर्डोन पुरस्काराने गौरवण्यात आले असून हा पुरस्कार इंजिनियरींग शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी व त्यांच्या या सह योगदानासाठी देण्यात येतो.

डीन योत्रासॉस यांनी आपल्या मुंबई आणि बंगळूरु भेटीत केलेली महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे अल्फ्रेड ई मॅन्न डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल इंजिनियरींग कडून ३५ दशलक्ष डॉलर्सची भेट होय. एखाद्या व्यक्ती कडून ‍ मिळालेली यूएस इंजिनियरींग इतिहासातील ही सर्वांत मोठी भेट आहे. या भेटी मुळे विभागाला इंजिनियरींग, औषधे आणि भविष्यातील पदवी, मास्टर्स आणि पीएचडी कार्यक्रमात भाग घेणे भारतीय विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे.  २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात डॉ. ॲलन ॲन्ड चारोलेट जिन्सबर्ग ह्युमन सेंटर्ड कम्प्युटेशन बिल्डिंगच्या भुमिपूजनानंतर ची ही सर्वात मोठी भेट आहे, ही इमारत २०२४ मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारचे अनेक टप्पे डीन यात्रोसॉस यांनी यूएससी वित्रेबी स्कूल ऑफ इंजिनियरींग च्या भारतातील सल्लागार मंडळा सह घोषित केले असून यामध्ये  दिग्गज अशा भारतीय पावरब्रेकर्स चा समावेश आहे.

ही सूची खालीलप्रमाणे –

  • ·श्रीनाथ बाटनी (चेअर), ॲक्सिलॉर व्हेंचर्स प्रा. लि. चे संचालक आणि सहसंस्थापक
  • श्रीनिवास  ‍चिनमल्ली, टेस्सॉल्व चे सह संस्थापक आणि सीईओ
  • अशोक दास, सन मोक्षा चे संस्थापक आणि सीईओ
  • अनंत कृष्णन् , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि सीटीओ
  • प्रियांका  मित्तल, केआरबीएल च्या संचालिका
  • एन आर नारायण मूर्ती , इन्फोसिस चे संस्थापक आणि एमिरट्स चेअरमन , कॅटामरान व्हेंचर्स चे संस्थापक
  • रणजीत नायर, सीईओ जर्मीन ८ सोल्युशन्स चे सीईओ
  • एन नरेंद्र, विनयास इन्नोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक
  • श्रीराम नेने- सीव्ही सर्जन, हेल्थकेअर इन्नोव्हेटर, संस्थापक आणि गुंतवणूकदार
  • नितीन शर्मा, अँथलर इंडिया, ग्लोबल वेब३लीड, अँथलर चे सहसंस्थापक आणि जनरल पार्टनर
  • किरण मुजूमदार शॉ, बायोकॉन च्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन
  • कुमार शिवराजन, तेजस नेटवर्क्स चे सीटीओ
  • संदीप टंडन, टंडन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे चेअरमन
  • गौतम वाय त्रिवेदी, नेपियन कॅपिटल एलएलपी चे सह संस्थापक आणि  मॅनेजिंग पार्टनर
  • राजन वासा, केपीएमजी इंडिया, गुजरात चे मॅनेजिंग पार्टनर

यूएससी विटरेबी इंडियाच्या सल्लागार मंडळासह यूएससी ॲल्युमनी व कुटूंबाला ‘ट्रोजान फॅमिली’ म्हणतात,  यूएससी विटरेबी तर्फे ॲक्सिलॉर व्हेंचर्स च्या सहकार्याने वार्षिक भाषणांच्या शृंखलेचे ही आयोजन करण्यात आले होते.   या उपक्रमा मध्ये चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते, यामध्ये भारतातील व अमेरिकेतील तज्ञ, नाविन्य निर्माता आणि व्यावसायिक एकत्र येऊन त्यांनी नवीन अत्याधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि इंजिनियरींग क्षेत्रातील संकल्पना मांडल्या.  यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये टीसीएस चे सीटीओ आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट  डॉ. अनंत कृष्णन यांनी ‘बिल्डिंग ग्रेटर फ्युचर्स विथ इन्नोव्हेशन ॲन्ड कलेक्टिव्ह नॉलेज’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तर ५सी नेटवर्क चे सहसंस्थापक आणि सीईओ कल्याण सिल्वसैलम यांनी एआय इन हेल्थकेअर विषयी चर्चा केली.

ईसीई डिपार्टमेंट, आयआयएससी, चे मानद प्राध्यापक डॉ. पी विजयकुमार हे यूएससी विटरेबी स्कूल ऑफ इंजिनियरींग चे माजी विद्यार्थी आणि एमिरेटस प्रोफेसर आहेत,  त्यांनी  नॅव्हीसीच्याएल१ सिग्नल च्या कोडच्या डिझाईन विषयी प्रसार करण्यावर जोर दिला.   दिवसाच्या शेवटच्या सत्रात यूएससी विटरेबी स्कूलचे माजी विद्यार्थी आणि ॲन्टलर चे सहसंस्थापक आणि जनरल पार्टनर नितीन शर्मा यांनी भारतीय स्टार्ट अप्स विषयी चर्चा केली.

“ आपल्या आसपासच्या समस्यांवर इलाज शोधण्यासाठी केवळ व्यावासयिकताच नव्हे तर ‍ विविध क्षेत्रातील नाविन्य असणे ही आवश्यक आहे.” असे ॲक्सिलॉर व्हेंचर्स चे सहसंस्थापक आणि सीईओ गणपती वेणूगोपाल यांनी सांगितले “ यूएससी ॲक्सिलॉर लेक्चर सिरीज हा नाविन्य प्रदात्यांना एकत्र आणून विविध प्रेक्षकांना एकत्र आणून मागणीवर उपाय शोधण्याचा एक प्रयत्न आहे.”