मुंबई, ऑगस्ट 2023: युपीएल लि. (NSE: UPL & BSE: 512070 LSE: UPLL) ((‘UPL’) या शाश्वत शेती उत्पादन क्षेत्रातील जागतिक पुरवठादार कंपनीला तिसऱ्यांदा क्लॅरिव्हेट साउथ एशिया इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. कंपनीला शेती व्यवसायासाठी या पुरस्काराने सन्मानित करत आघाडीची इनोव्हेटर म्हणून दखल घेतली आहे.
पुरस्कारासाठी पेटंट संख्येचे (प्रकाशित पेटंट्स) निकष आणि पेटंटचा दर्जा (ग्रँटच्या यशाचा दर, जागतिकीकरणाची मर्यादा व प्रशस्तीपत्रक) यानुसार विश्लेषण केले जाते. हा पुरस्कार कंपनी प्रदीर्घ काळापासून शाश्वत व खाद्यपदार्थांच्या बाबतीत सुरक्षित असलेले भविष्य तयार करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना तसेच कंपनीची १४०० पेटंट्स व १४,००० रजिस्ट्रेशन्सना मिळालेली पावती आहे.
ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रमुख डॉ. विशाल सोढा म्हणाले, ‘प्रत्यक्ष जगात बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्णता महत्त्वाची आहे असे युपीएलला वाटते. शाश्वत तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याच्या आणि शेतकऱ्यावर लक्ष केंद्रित करणारी उत्पादने तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांची क्लॅरिव्हेट साउथ एशिया इनोव्हेशन पुरस्काराने तिसऱ्यांदा दखल घेतली आहे. सातत्यपूर्ण संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही आगामी पिढ्यांसाठी लवचिक, समृद्ध व शाश्वत शेती यंत्रणा उभारणार आहोत.’
डॉ. उन्नत पंडित, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाइन्स आणि ट्रेडमार्क्स, भारत सरकार यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्लॅरिव्हेटने २८ जुलै २०२३ रोजी भारतात, मुंबई येथे झालेल्या इनोव्हेशन फोरममध्ये विजेत्यांची घोषणा केली. दक्षिण आशियातील आघाडीचे इनोव्हेटर्स निवडण्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीमध्ये प्रत्येक पेटंटेड संकल्पनेच्या ताकदीचे विश्लेषण करण्यासाठी जागतिक इन्व्हेन्शन डेटाचे तुलनात्मक विश्लेषण, त्यांच्या नाविन्यपूर्णतेशी थेट संबंधित असलेल्या उपायांचा वापर आणि डरवेंट वर्ल्ड पॅटर्न इंडेक्स व डरवेंट पेटंट्स सायटेशन इंडेक्सच्या डेटाचे विश्लेषण यांचा त्यात समावेश आहे.