युनिटी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ९ टक्के दराने व्याज तर किरकोळ गुंतवणूकदारांना ८.५० टक्के

107

पुणे, २१ नोव्हेंबर २०२२ : चढ्या व्याजदर प्रणाली आणि अलीकडेच लाँच केलेल्या आपल्या ‘शगुन’ या विशेष मुदत ठेव व्याजदराच्या यशाचा फायदा घेत, नव्या युगातील डिजिटल फर्स्ट बँक असलेल्या युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (युनिटी बँक) मुदत ठेवींवरील व्याजदरात आणखी वाढ केली आहे. ती आता ज्येष्ठ नागरिकांना १८१ आणि ५०१ दिवसांच्या मुदतीसाठी गुंतवलेल्या मुदत ठेवींवर वार्षिक ९ टक्के हा आकर्षक दर देत आहे, किरकोळ गुंतवणूकदारांना त्याच कालावधीसाठी ८.५० टक्के दर मिळेल. बँकेने नोव्हेंबर महिन्यात केलेली ही दुसरी व्याजदर सुधारणा आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराने परतावा मिळू शकेल.

युनिटी बँकेने कॉलेबल आणि नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिट्स (रु.२ कोटींपेक्षा जास्त ठेवी) वरील व्याजदरातही वाढ केली आहे. आता कॉलेबल बल्क ठेवींवर वार्षिक ८ टक्के पर्यंत व्याज मिळेल तर नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिट्सवर वार्षिक ८.१० टक्के पर्यंत व्याज मिळेल.

बचत खात्यांसाठी, युनिटी बँकेकडून १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक ७ टक्के आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक ६ टक्के व्याज देण्यात येत आहे.

युनिटी बँक ही शेड्यूल्ड कमर्शियल बँक असून सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड हे तिचे प्रवर्त आहेत आणि रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे सह-गुंतवणूकदार आहेत.