युनिटी बँकचा पुणे शहरात तीन नवीन शाखा उघडून अस्तित्त्व विस्तार

141
Unity Bank expands its presence in Pune city by opening three new branches

पुणे :  नवयुगाची डिजिटल फर्स्ट बँक असणाऱ्या युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (युनिटी बँक), शहरात तीन नवीन शाखांच्या उद्घाटनासह पुण्यातील उपस्थितीत आणखी वाढ केली आहे. औंध, भांडारकर रोड आणि सिंहगड रोड येथील या नवीन अत्याधुनिक शाखा शहरातील वाढत्या व्यवसायाच्या संधींचा फायदा घेण्यासह, ग्राहकांना ठेवींवर आकर्षक व्याजदर प्रदान करतील, लघू व्यावसायिक, एमएसएमईंना व्यवसाय कर्ज देऊ करतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील रहिवाशांना अधिक स्मार्ट, जलद आणि अधिक सोयीस्कर अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह बँकिंगची संधी प्रदान केली जाईल. या नवीन शाखा सुरू झाल्यामुळे युनिटी बँकेच्या आता राज्यात एकूण १३ शाखा झाल्या आहेत.

युनिटी बँक ज्येष्ठ नागरिकांना प्रति वर्ष ९.५ टक्के* या आकर्षक दराने मुदत ठेवींवर व्याज देते तर सर्वसामान्य गुंतवणूकदार प्रति वर्ष ९.०० टक्के* व्याजदर मिळवतात. बचत खात्यांसाठी, युनिटी बँक  १ लाखांपेक्षा जास्त रकमेचसाठी प्रति वर्ष ७ टक्के दराने आणि १ लाखांपर्यंत रकमेसाठी प्रति वर्ष ६ टक्के व्याज देते. शिवाय निवडक शाखांमध्ये लॉकर देखील स्पर्धात्मक दरात उपलब्ध आहेत.

Unity Bank expands its presence in Pune city by opening three new branches

शहरातील या विस्तारावर भाष्य करताना, युनिटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित कामोत्रा म्हणाले, “पुणे हे त्याच्या विस्तृत तंत्रज्ञानसमृद्ध मनुष्यबळ प्रतिभा आणि राज्याच्या नाविन्यपूर्ण व्यवसाय धोरणांमुळे उद्योजकतेचे केंद्र म्हणून मजबूतपणे उदयास येत आहे. अनेक ऑटो आणि आयटी तसेच आयटीसंलग्न सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे घर असण्यासोबतच, त्यात मिश्र लोकसांख्यिकीय रचना आणि वाढत्या पायाभूत सुविधांमुळे ते नवीन काळातील, डिजिटल फर्स्ट बँकिंग सेवा देण्यासाठी एक आकर्षक शहर बनले आहे. आम्ही येथे आमच्या कार्याचा विस्तार करण्यास आणि रिटेल, उच्च धनसंपदा असणाऱ्या व्यक्ती आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या बँकिंग आणि गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यास उत्सुक आहोत”

युनिटी बँक ही सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे प्रवर्तित केली गेलेली एक शेड्युल्ड कमर्शियल बँक आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत तिचे संपूर्ण भारतात १२३ शाखांचे जाळे आहे.