युटीआय म्युच्युअल फंडने ‘युटीआय बॅलेन्स्ड ॲडवान्टेज फंड’ बाजारात आणले

29
UTI-Mutual-Fund

युटीआय म्युच्युअल फंडने ‘युटीआय बॅलेन्स्ड ॲडवान्टेज फंड’ बाजारात आणले, जे एक ओपन एंडेड डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड आहे. हा फंड इक्विटी आणि निश्चित उत्पन्न यांच्या वैविध्य असलेल्या  पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतो. या योजनेतील पोर्टफोलिओ, ज्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायची आहे तिचे मूल्यांकन  करून त्याआधारे आणि युटीआयच्या स्वतःच्या (इन्हाऊस) मूलभूत प्रोप्रायटरी ॲसेट अलोकेशन मॉडेलच्याआधारे  डायनॅमिक अलोकेशन पद्धतीने व्यवस्थापित केले जातील. एनएफओ (न्यू फंड ऑफर NFO) २१ जुलै २०२३ ला चालू होऊन ४ ऑगस्ट २०२३ ला बंद होईल.

डायनॅमिक धोरण पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या इक्विटी आणि डेट इन्स्ट्रूमेंट्सच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल मूल्यवर्धन (कॅपिटल ॲप्रिसिएशन) आणि उत्पन्न मिळवून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तरीही, या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईलच याची खात्री नसून योजना कोणत्याही परताव्याची हमी देत नाही किंवा तसे सूचित देखील करीत नाही.  

युटीआय एएमसी लिमिटेडचे सीआयओ श्री. वेत्री सुब्रमणीयम या लॉंच बाबत बोलताना म्हणाले, म्युच्युअल फंडमधून जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यातील बहुतेक गुंतवणूकदारांसमोर  अस्थिरतेला कसे हाताळावे हे आव्हान असते. इक्विटीमध्ये गुंतवणूक का करावी हे त्यांना माहीत असते, त्यातून संपत्ती निर्मिती करण्याची त्यांची इच्छा देखील असते पण त्यांना या प्रक्रियेमध्ये जी अस्थिरता आहे तिला कसे हाताळावे हे ठाऊक नसते. मालमत्तेचे वाटप कसे करावे याची एक योग्य चौकट आणि त्यास पुन्हा संतुलित करण्याची एक यंत्रणा याची गुंतवणूकदारांना आवश्यकता आहे.

‘युटीआय बॅलेन्स्ड ॲड्वान्टेज फंड’ची प्रमुख वैशिष्ठ्ये:

  • पात्र गुंतवणूकदार-
    • ज्यांना दीर्घकालिन संपत्ती निर्मिती करायची आहे असे गुंतवणूकदार.
  • इक्विटी आणि निश्चित उत्पन्न यांच्या वैविध्य असलेल्या  पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले गुंतवणूकदार 
  • बाजारातील अस्थिरतेचा धोका कमी करण्यासाठी डायनॅमिक अॅसेट अलोकेशन सोल्यूशन शोधत असलेले गुंतवणूकदार. 
  • गुंतवणुकीतील धोका चांगल्याप्रकारे समायोजित केलेले आणि करामध्ये देखील बऱ्यापैकी चांगला परतावा देऊ शकेल असे उपाय शोधणारे गुंतवणूकदार 
  • फंड  व्यवस्थापक-
  • इक्विटी-सचिन त्रिवेदी; निश्चित उत्पन्न (फिक्स्ड इन्कम)- अनुराग मित्तल 
  • न्यू फंड ऑफर (NFO) किंमत-
  • न्यू फंड ऑफर (NFO) च्या काळामध्ये योजनेचे युनिट रु. १०/- रुपये प्रति युनिट या फेस वॅल्यू (दर्शनी मूल्य) ने विकले जातील. 
  • न्यू फंड ऑफर (NFO) घेण्यासाठी किमान रक्कम
  • न्यू फंड ऑफर (NFO) घेण्यासाठी किमान रक्कम रु. ५०००/- असून त्यापुढे एक रूपयाच्या पटीमध्ये द्यावे लागतील 
  • उपलब्ध योजना आणि पर्याय:
  • रेग्युलर योजना आणि डायरेक्ट योजना – या दोन्ही योजना आयडीसीडब्ल्यू (IDCW) पर्यायांचे पेआउट आणि वाढ हे प्रदान करतात.
  • लोड स्ट्रक्चर:
  • एंट्री लोड (सुरुवातीला यूनिट घेताना लागणारी फी)– लागू नाही 
  • एक्जिट लोड (युनिट परत देऊन पैसे मिळताना लागणारी फी)
  1. वाटपंच्या तारखेपासून १२ महिन्याच्या आत बाहेर पडल्यास किंवा युनिट  रिडिम केल्यास: 
  1. वाटप केलेल्या युनिट्स च्या १०%पर्यंत -काही नाही (शून्य)
  2. वाटप केलेल्या युनिट्स च्या १०% च्या पुढे –१.०%
  1. त्यापुढे काही नाही (शून्य)

उत्पादन लेबल आणि रिस्कोमीटर (जोखीम मोजमापयंत्र):

युटीआय बॅलेन्स्ड अॅड्वान्टेज फंड

एक ओपन एंडेड डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड

हे उत्पादन अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे जे शोधत आहेत:*

  • दीर्घकालीन भांडवल मूल्यवर्धन (कॅपिटल ॲप्रिसिएशन) आणि उत्पन्न 
  • डायनॅमिक धोरण पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या इक्विटी आणि डेट इन्स्ट्रूमेंट्सच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक

*उत्पादन आपल्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत शंका असल्यास आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा 

   

*टीप:न्यू फंड ऑफर (NFO) दरम्यान नियुक्त केलेल उत्पादन लेबलिंग योजनेच्या वैशिष्ठ्यांच्या किंवा मॉडेल पोर्टफोलिओच्या अंतर्गत मूल्यांकनावर आधारित असते आणि वास्तविक गुंतवणूक केल्यावर न्यू फंड ऑफर (NFO)च्या नंतर ते बदलू शकतात.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.