‘या’ भूमिकेसाठी सुबोधला मिळाले होते १०० रुपये मानधन

148

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे सुबोध भावे. त्याने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही भूमिका तर विशेष गाजल्या. सतत चित्रीकरणामध्ये व्यग्र असणारा सुबोध आता लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो आहे. नुकताच त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चित्रपटातील भूमिकेसाठी १०० रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले आहे.

सुबोधने सोशल मीडियावर एका चित्रपटातील सीनचा फोटो पोस्ट केला आहे. हा सीन त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटातील असून या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला १०० रुपये मानधन मिळाले असल्याचे त्याने म्हटले आहे.

सुबोधने फोटो शेअर करत, ‘माझा पहिला चित्रपट, सुधीर फडके यांची निर्मिती असलेला “वीर सावरकर.” मदनलाल धिंग्रा लॉर्ड कर्झनची हत्या करतो तो सीन. मदनलाल धिंग्रा दारातून आतमध्ये प्रवेश करताना दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी. पाहिले मानधन १०० रुपये’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

नुकताच सुबोधने त्याच्या पहिल्या चित्रपटातील फोटो शेअर करत जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. त्याच्या करिअरमधील ‘वीर सावरकर’ हा पहिला चित्रपट आहे. तसेच या पहिल्यावहिल्या चित्रपटात त्याने ब्रिटीश सैनिकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला केवळ १०० रुपये मानधन मिळाले होते.