यजमान लॉयला प्रशालेची दमदार आगेकूच

64
पुणे, ३ डिसेंबर २०२२  ः टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत यजमान लॉयला प्रशाला संघाने शुक्रवारी तिनही वयोगटात विजय मिळवून आपली दमदार आगेकूच कायम राखली.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात आदिराज सिंगने नोंदवलेल्या दोन गोलसह एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशालेचा ५-१ असा पराभव केला.
लॉयलाकडून तनुष खुणे, अनुराग पारसनीस आणि शॉन आंग्रे यांनी एकेक गोल केला.एसएसपीएमएसकडून स्वराज मानेने एक गोल केला.
लॉयला प्रशाला संघाने १४ आणि १६ वर्षांखालील गटातील सामन्यात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचाच ७-० असा पराभव केला.
१४ वर्षांखालील गटात दर्श कासट आणि पार्थ शिंदे यांनी प्रत्येकी तीन, तर परम कुलकर्णीने एक गोल केला.
१६ वर्षांखालील गटात वेदांत गुप्ताने तीन, तर युवराज भोसले, ब्रायन डीसुझा, धीर परमार, जतिन नायडू यांनी एकेक गोल केला.
निकाल –
१२ वर्षांखालील गट
लॉयला प्रशाला ५ (तनुष खुणे ११वे, अदिराज सिंग १३, २१वे, अनुराग पारसनीस, शॉन आंग्रे ३९वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग स्कूल १ (स्वराज माने २९वे मिनिट)
 
१४ वर्षांखालील गट
लॉयला प्रशाला ७ (दर्श कासट ८, ३९, ४८वे, पार्थ शिंदे २७, ३०, ४८वे, परम कुलकर्णी ५०वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०
 
१६ वर्षांखालील गट
लॉयला प्रशाला ७ (युवराज भोसले ७वे, वेदांत गुप्ता ११, १३, १५वे मिनिट, ब्रायन डीसूझा २२वे, धीर परमार २७वे, जतिन नायडू ३६वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०