यंदाच्या हिवाळ्यात द बॉडी शॉपचे  व्हीगन अव्हॅकडो बॉडी बटर हे नवीन उत्पादन बाजारात दाखल

86

पुणे, ३ डिसेंबर  २०२२ : हिवाळा सुरु झाला आहे आणि तापमानात झालेल्या घसरणीचा अर्थ आता तुमच्या त्वचेला अधिक आर्द्रतेची आणि पोषणाची गरज भासणार आहे. तुमची त्वचेचा लवचिकपणा आणि मृदता जपण्यासाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेला आंतरराष्ट्रीय कॉस्मॅटिक आणि पर्सनल केअर ब्रॅण्ड द बॉडी शॉपने आपल्या अव्हॅकडो आधारित बॉडी केअर उत्पादनांची श्रेणी आणखी विस्तारली असून आता या श्रेणीमध्ये अव्हॅकडो बॉडी बटर या नव्या उत्पादनाचे आगमन झाले आहे. 

अव्हॅकडो हे आरोग्यालाविशेषत: तुमच्या त्वचेला भरपूर फायदे मिळवून देणारे सुपरफूड आहे. मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आणि अड तसेच ई जीवनसत्वाने समृद्ध असलेले अव्हॅकडो तुमच्या त्वचेला आर्द्रता व पोषण करण्याच्या दृष्टीने तसेच तिचे यूव्ही किरणांपासून संरक्षण करण्याच्य आणि तिची लवचिकता सुधारण्याच्या दृष्टीने प्रचंड लाभदायक आहे. 

९६ टक्‍के निसर्गप्राप्त घटकांपासून बनविलेले द बॉडी शॉपचे अव्हॅकडो बॉडी बटर तुमच्या त्वचेला आवश्यक ती आर्द्रता पुरवून तिला नवी तजेला मिळवून देईल आणि कोरडेपणा  सुरकुत्यांपासून तिचे ९६ तासांपर्यंत संरक्षण करेल. या मऊमुलायमसुगंधी बॉडी बटरमधील दक्षिण आफ्रिकेतून निसर्गस्नेह पद्धतीने प्राप्त करण्यात आलेले हॅस अव्हॅकडो ऑईल हा या उत्पादनाच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे. याखेरीज घाना येथील हातांनी बनविलेले कम्युनिटी फेअर ट्रेड शिया बटरपेरूमधून आणलेले कम्युनिटी फेअर ट्रेड ब्राझल नट ऑइल हे घटक तुमच्या त्वचेचा आवश्यक ते मॉइश्चर पुरवून तिचे पोषण करतात आणि चिपचिपितपणाचा लवलेशही न ठेवता तुमच्या त्वचेचे शुष्कतेपासून संरक्षण होण्यास मदत करतात.

द बॉडी शॉपच्या अव्हॅकडो उत्पादन श्रेणीमध्ये एक शॉवर क्रीमएक बॉडी लोशन टू ऑइलएक हॅण्ड बाम आणि एका बॉडी स्क्रबचा समावेश आहे. अव्हॅकडो बॉडी स्क्रब हा एक उत्तम एक्स्फॉलिएटर आहेजो तुमच्या वरील मृत पेशी काढून टाकतोतुमच्या त्वचेला अधिक मुलायम बनवतोखास कोरड्या त्वचेसाठी तयार करण्यात आलेले शॉवर क्रीम तुमच्या त्वचेला स्वच्छ करणारा आणि आर्द्रता देणारा आनंददायी स्नानानुभव मिळवून देत. इतकेच नव्हे तर हॅण्ड बाम तुमच्या हातांची स्निग्धता टिकून ठेवतो आणि अखेर द बॉडी शॉपचे अव्हॅकडो लोशन-टू-ऑईल हे एक तजेला देणारेहलका सुगंध असलेले लोशन आहे, जे तुमच्या त्वचेला मुलायम करण्यासाठीतिची शुष्कता हळुवारपणे दूर करण्यासाठी व तिला एक निरोगी चमक मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या सर्व उत्पादनांमध्ये अव्हॅकडोची गुणकारी तत्वे आहेत. ही उत्पादने १०० टक्‍के व्हिगन आहेत व त्यांना पर्यावरणस्नेहीरिसायकल करण्यायोग्य पॅकेजिंग पुरविण्यात आले आहे. 

द बॉडी शॉपचे अव्हॅकडो पुरवठादार झीरो लँण्डफील धोरणाचा अवलंब करतात. याचा अर्थ तेल बनविण्यासाठी वापरण्यात न येणाऱ्या फळांचे खत बनविले जाते. या उत्पदनांना व्हिगन सोसायटीचे प्रमाणन प्राप्त असून त्यांनी डर्मेटोलॉजिकल चाचण्या पार केल्या आहेत.