मेडिक्स ग्लोबल आणि एम्पॉवर यांची भागीदारी भारतामध्ये मानसिक आरोग्याविषयीचे कलंक दूर करण्यासाठी प्रयत्न करणार

81

मुंबई१६ डिसेंबर २०२२: मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये संपूर्ण जगभरात वाढ होत आहेमहामारीच्या काळात आणि त्यानंतर यामध्ये वेगाने वाढ होत आहे.

भारतीयांना आपले मानसिक आरोग्य अधिक चांगले ठेवता यावे यासाठी तंत्रज्ञान/डिजिटल उपाय उपलब्ध करवून देण्याबरोबरीनेचआरोग्यापुरक चर्चांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही भागीदारी भारतातील युवा पिढ्यांना मानसिक सहायता सेवांचा जास्तीत जास्त उपयोग करवून घेण्यासाठी प्रोत्साहन देईल.

  • डॉ. नीरजा बिर्ला यांनी एम्पॉवरची सुरुवात केली असूनहा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एक उपक्रम आहे. या क्रांतिकारी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भारतात सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल सेवा पुरवल्या जातात.
  • मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रणी एम्पॉवरमध्ये २०० पेक्षा जास्त अनुभवी मानसिक आरोग्य प्रोफेशनल्स कार्यरत असून ते जागतिक दर्जाचीवैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली उपचार तंत्रे पुरवतात.  भारतामध्ये आपल्या मानसिक आरोग्य देखभाल सेवांच्या माध्यमातून एम्पॉवरने १२१ मिलियनपेक्षा जास्त व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव घडवून आणला आहे. 
  • जागतिक स्तरावरील आरोग्य व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव मेडिक्सच्या गाठीशी असून भारतावर त्यांनी आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ३०० पेक्षा जास्त इन-हाऊस डॉक्टर्स आणि प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कीर्तीच्या विशेषज्ञांचे गुणवत्ता प्रमाणित नेटवर्क यांच्यासह मेडिक्स जगभरातील ८ मिलियनपेक्षा जास्त ग्राहकांना पुरवते.
  • कलंक-मुक्त आणि मानसिकदृष्ट्या निरोगी समाज निर्माण करणे‘ हे एम्पॉवरचे मूलभूत मूल्य आणि जीवनातील शारीरिक व भावनिक वाटचालीमध्ये व्यक्तींना साहाय्य प्रदान करणे‘ ही मेडिक्सची वचनबद्धता यांचा मिलाप या भागीदारीमध्ये घडून आला आहे.
  • खासकरून १६ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांसाठीमानसिक आरोग्य देखभाल सेवा अधिक जास्त उपलब्ध आणि अंमलात आणण्याच्या दृष्टीने अधिक जास्त सुलभ असाव्यात यासाठी प्रयत्न करण्याबरोबरीनेच नैराश्यताणचिंता आणि वृत्तींमधील विकार यांच्याशी संबंधित कलंक कमी करण्यासाठी ही भागीदारी काम करेल. 
  • या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून मेडिक्स इंडिया एम्पॉवरच्या मानसिक आरोग्य सेवांना आपल्या विविध मूलभूत कार्यक्रमांमध्येग्राहकांना दिल्या जात असलेल्या सेवांमध्ये समाविष्ट करवून घेईलत्यांच्या ग्राहकांमध्ये आघाडीच्या विमा कंपन्याकॉपोरेट कंपन्या आणि इतर हितधारकांचा समावेश आहेत्यांना एम्पॉवर क्लिनिक्स व व्हर्च्युअल मानसिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल. 
  • मानसिक सहायता सेवांमध्ये नव्या तंत्रज्ञान व डिजिटल उपायांचा समावेश करण्यात येईलज्यामुळे सेवा पुरवठ्यामध्ये सुधारणा होईल आणि उपलब्धता वाढेल.
  • या भागीदारीचे नेतृत्व दोन अतिशय प्रभावी व स्वतःच्या कामाप्रती निष्ठावान महिला करत आहेतज्यांना भारतामध्ये मानसिक आरोग्यासाठी आवश्यक घटक पुरवण्यासाठी आपले अनोखे दृष्टिकोन आणि विचार लागू करत असल्याचा अतिशय अभिमान आहे.

मेडिक्स ही जागतिक पातळीवरील आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी असूनलाखो ग्राहकांच्या आरोग्यविषयक गरजांवर प्रभावी उपाययोजना पुरवते. ३०० पेक्षा जास्त इन-हाऊस फिजिशियन्स आणि जागतिक पातळीवरील आघाडीच्या ४५०० पेक्षा जास्त विशेषज्ञांचे गुणवत्ता प्रमाणित नेटवर्क असलेल्या या कंपनीने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एक उपक्रम आणि भारतात मानसिक आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एम्पॉवरसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. एम्पॉवरसोबत ६०० पेक्षा जास्त अनुभवी मानसिक आरोग्य प्रोफेशनल्स काम करत असून ते जागतिक दर्जाचीवैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली उपाय तंत्रे पुरवतातज्यांनी आजवर १२१ मिलियनपेक्षा जास्त व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून एम्पॉवर आणि मेडिक्स भारतात मानसिक आरोग्य सेवा अधिक जास्त सहजपणे उपलब्ध करवून देण्यासाठी एकीकृत व प्रगत तंत्रज्ञान उपाययोजना पुरवणार आहेत.

एम्पॉवर आणि मेडिक्स यांची भागीदारी भारतात मानसिक आरोग्याविषयी केल्या जाणाऱ्या चर्चासंवादांमध्ये बदल घडवून आणेलमदत आणि साहाय्य मिळवण्याच्या नव्या मार्गांना प्रोत्साहन दिले जाईल. ही भागीदारी मानसिक आणि भावनिक सल्लासेवा आणि मार्गदर्शन यांना एक नवासर्वसमावेशक दृष्टिकोन मिळवून देईल जो देशातील युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी खास डिझाईन करण्यात आलेला असेल.

या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून मेडिक्स इंडिया एम्पॉवरच्या मानसिक आरोग्य सेवांना आपल्या विविध मूलभूत कार्यक्रमांमध्येग्राहकांना दिल्या जात असलेल्या सेवांमध्ये समाविष्ट करवून घेईलत्यांच्या ग्राहकांमध्ये आघाडीच्या विमा कंपन्याकॉपोरेट कंपन्या आणि इतर हितधारकांचा समावेश आहेत्यांना एम्पॉवर क्लिनिक्स व व्हर्च्युअल मानसिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल.

या भागीदारीमधील ज्ञानमाहिती आणि सेवा भागीदार म्हणून एम्पॉवर मानसिक आरोग्य क्षेत्रातील आपले नैपुण्य वापरूनमानसिक आरोग्य सहायता मिळवण्यासाठी आलेल्या रुग्णांना आजवर सिद्ध झालेल्या विविध मानसिक आरोग्य उपाययोजना आणि थेरपीज उपलब्ध करवून देईल. मेडिक्स गुणवत्तेची खात्रीलक्ष्य निश्चित करण्याची धोरणेक्लिनिकल उपायडिजिटल मानसिक आणि शारीरिक मूल्यांकने आणि परिणाम मोजण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरणेविश्लेषण इत्यादी उपलब्ध करवून देईल. भारतातील आजवरच्या मानसिक आरोग्याच्या देखभालीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये अशाप्रकारे नवपरिवर्तन घडवून आणले जाईल.

एम्पॉवरच्या संस्थापिका आणि अध्यक्ष डॉ. नीरजा बिर्ला यांनी सांगितलेएम्पॉवर भारतात मानसिक आरोग्य क्षेत्रात आघाडीवर आहे आणि या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारा उपक्रम हे आमचे स्थान अधिक जास्त बळकट करण्याच्या दृष्टीने आम्ही या या भागीदारीच्या रूपाने पुढचे पाऊल उचलले आहे.  आजारी लोकांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सर्रास आढळून येतात कारण मानसिकशारीरिक व सामाजिक घटक आपापसांत खूप जोडले गेलेले असतात.  एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. या भागीदारीने रुग्णांना सर्वसमावेशक उपाययोजना उपलब्ध करवून दिल्या आहेतत्यांना आता शारीरिक व मानसिक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. आम्हाला आशा आहे कीअशा भागीदारी भारतामध्ये सर्वसमावेशक आरोग्य देखभाल व्यवस्थापनामध्ये नवा अध्याय सुरु करतीलमानसिक व शारीरिक आरोग्याला समान महत्त्व मिळवून देतीलया क्षेत्रातील संशोधनसहभाग आणि उपलब्धता यांना प्रोत्साहन देतील व मानसिक आरोग्याशी निगडित कलंक दूर करतील.”

मेडिक्सच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सिगल अट्झमोन म्हणाल्या, “एम्पॉवरसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो कारण हे दोन्ही ब्रँड्स एकमेकांना अनुरूप आहेतलोकांच्या जीवनावर या दोन्ही ब्रँड्सनी खूप प्रभाव निर्माण केला आहे. मानसिक आरोग्य हा खूप गहन आणि अनेक पैलू असलेला विषय आहेव्यक्ती कायकसा विचार करतेकशी वागते यावर मानसिक आरोग्याचा खूप गंभीर प्रभाव पडत असतो. आज युवा पिढीवर भरपूर ताणतणाव आहेत आणि त्याची कारणे वेगवेगळी आहेत.  या आव्हानांचा मुकाबला सकारात्मक पद्धतीने कसा करायचा हे त्यांना बऱ्याचदा ठाऊक नसते. मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक दूर करणे हा आमचा उद्देश आहे.  आव्हाने दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आणि सहज वापरता येतील असे उपाय पुरवून चर्चा व संवादांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.”  

मानसिक आरोग्य ही भारतातील सध्याची खूप गंभीर समस्या आहेखासकरून युवा पिढीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड मेंटल हेल्थ रिपोर्ट २०२२ नुसारगंभीर मानसिक आरोग्य समस्या असलेल्या व्यक्ती इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा १० ते २० वर्षे आधी जीव गमावतात. बऱ्याचदा हे मृत्यू सहज टाळता येण्याजोग्या शारीरिक आजारांमुळे होतात. “मेंटल हेल्थ अँड वेलंबींग इन द वर्कप्लेस” या डेलॉइटच्या २०२२ सर्व्हेनुसारगेल्या वर्षी भारतातील ८०% कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आरोग्य समस्या असल्याचे सांगितले होते.  ही इतकी गंभीर आकडेवारी दिसत असताना देखील सामाजिक गैरसमजुती आणि कलंकांमुळे जवळपास ३९% व्यक्ती उपचार करवून घेत नाहीत.

या भागीदारीमध्ये एम्पॉवर आणि मेडिक्स हे २०२३ पासून भारतात मानसिक आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे, अधिक सहजपणे उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध आहेत!