मॅनलिटिक्स करणार कर्मचारी संख्या दुप्पट

77

पुणे, २ जानेवारी २०२२ :  अमेरिकेसह, संयुक्त अरब अमिरातीत आणि भारतात  मुंबई व पुणे येथे कार्यालये असलेल्या मॅनलिटिक्स बी टू बी आयटीईएस प्रा. लि. या जाहिरात आणि विपणन क्षेत्रातील सेवा देणाऱ्या कंपनीने सलग तिसऱ्या वर्षी उत्तम कामगिरी केली असून, कंपनी वेगाने व्यवसाय वाढ करत आहे. त्यामुळे सध्या ५०० हून अधिक असलेली कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मिश्रा यांनी दिली.नुकतेच कंपनीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला,प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक राजीव राजा यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

तंत्रज्ञान कंपन्यांना ई-मेल मार्केटिंग आणि टेलि-मार्केटिंगद्वारे त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करण्याच्या उद्देशाने मॅनलिटिक्स बी- टू- बी आयटीईएस प्रा. लि. या कंपनीची स्थापना मनीष मिश्रा, आनंद दुबे, शिल्पिका मिश्रा आणि स्नेहा दुबे यांनी केली आहे.

कंपनीचे सीएफओ आनंद दुबे म्हणाले, “आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, काम करण्याची उर्मी जागृत करण्याची आमची क्षमता ही माझ्याकडे असलेली सर्वांत मोठी संपत्ती आहे. एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचे कौतुक, सन्मान करणे हा होय. तोच आम्ही अनुसरला आहे. कंपनीचा फायदा सर्वांनी वाटून घेण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. म्हणूनच आम्ही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी कार्स, दुचाकी अशी वाहने, उपयुक्त इलेक्ट्ऱॉनिक वस्तू आदी भेट देण्याचा विचार केला.”

मनीष मिश्रा म्हणाले, “आमची कंपनी ज्या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहे. त्या क्षेत्रातील भारतातील एक अग्रगण्य कंपनी बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या ग्राहकांना आम्ही उत्कृष्ट सेवा देत असून, त्या बळावर आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत.”