मॅक्स टेस्ट कडून प्रमाणित, मैग्निकूल लक्झरी मॅट्रेस करतात उकाड्यापासून बचाव

36

थकवा आणि चिकट उन्हापासून बचाव करण्यासाठी, नुकतीच मॅग्निफ्लेक्स इंडिया कडून मॅग्निकूल मॅट्रेसेसची सुरुवात करण्यात आली असून हे मॅट्रेस चांगला आराम आणि चांगल्या गुणवत्तेची झोप देण्यास मदत करतात. क्रांतिकारी मॅट्रेसेस तापमान कमी करतात आणि तुमच्या त्वचेच्या संपर्कात येताच तुम्हाला ताजातवाना अनुभव देतात. मॅग्निकूल ओएको टेक्स आणि एसीए प्रमाणित आहेत. या मॅट्रेस मध्ये जपानी कपड्यांचा उपयोग केला गेला आहे, तसेच यांचे डिझाईन तापमानाला नियंत्रित करण्यासाठी हवेच्या खेळण्यावर नियंत्रण मिळते जेणेकरुन शरीरात आणि मॅट्रेस मध्ये मायक्रोक्लायमेट तयार होते.

मॅग्निकूल मॅट्रसेस विषयी बोलतांना बंगलोरच्या ट्रस्ट इन हॉस्पिटल चे मेडिकल डायरेक्टर एमबीबीएस डॉ. शंकर एस बिरादर यांनी सांगितले “ आपल्या झोपेच्या गुणवत्ते मध्ये शरीराचे तापमान महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असते. काही मॅट्रेसेस मुळे शरीराचे तापमान वाढते त्यामुळे झोप आरामदायक होत नाही आणि अखंड झोप मिळत नाही. रात्रीची झोप नीट व्हावी यासाठी शरीराच्या तापमानाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. मॅग्निकूल थर्मोस्टॅट्स प्रमाणे काम करते, जेणकरुन शरीराच्या तापमानावर नियंत्रण प्राप्त होते आणि ताजेतवाने वाटते. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे मॅट्रेस योग्य आराम देऊन शरीराला ताजेतवाने ठेवते. यामुळे चांगली झोप मिळून शरीराला आवश्यक थेरॉप्टिक लाभ प्राप्त होतो आणि ताजातवाना अनुभव प्राप्त होतो.”

मॅग्निकूल ची निर्मिती ही मसाजिंग सिस्टमने युक्त क्विल्टेड मेमोफोम मटेरियल, सुपर सॉफ्ट फायबर आणि हायपोॲलर्जीक फायबर पॅडिंग ने केलेली आहे, त्यामुळे आराम तर मिळतोच पण त्याच बरोबर आपल्या शरीराच्या वळणांनुसार ते आकार बदलतात. कापडा मध्ये सिलिकेट बरोबरच हजारो मायक्रोपार्टिकल्स असतात जे फायबर मध्ये वाटले जाऊन तापमान कमी करतात. या मॅट्रेस मध्ये तापमानावर नियंत्रण करणारी वैशिष्ट्ये असतात जी कोणत्याही वातावरणासह मौसमातील स्थिती नुसार योग्य असतात.

Magniflex_Logo

मागील महिन्यांत मॅट्रेस खरेदी केल्यानंतर एक ग्राहक फ्रँकलिन सी यांनी मॅग्निकूल बद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले “ आधी मला उकाड्यामुळे झोपेची समस्या असे. या आधीच्या मॅट्रेस मध्ये मला खूप घाम यायचा आणि त्यामुळे वेळोवेळी माझी झोपमोड होत असे. मी मॅग्निकूल चा वापर सुरु केल्यापासून झोपेत चांगली सुधारणा होऊ लागली आहे, मॅट्रेस माझ्या शरीराच्या तापमानाला निंयंत्रित करते आणि लगेच गारवा देते. आता मला आरामदायक वाटते आणि माझी रात्रीची झोप अधिक चांगली मिळू लागली आहे.”

आता मॅग्निकूल आपल्याला नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या मॅग्निफ्लेक्स इन्व्हेस्टमेंट प्लान (एमआयपी) च्या माध्यमातूनही खरेदी करणे शक्य होईल. मॅग्निफ्लेक्स इंडिया कडून सुरु करण्यात आलेल्या संरचनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण झोपेच्या माध्यमातून आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. एमआयपी च्या माध्यमातून ग्राहकांना आता विविध विभागातील उत्पादने ईएमआय च्या पर्यायायसह उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.