मुथ्थुट मायक्रोफिन लिमिटेड तर्फ सेबीकडे डीआरएचपी दाखल

32

मुथ्थुट मायक्रोफिन लिमिटेड या स्त्री ग्राहकांना लघुकर्ज पुरवणाऱ्या आणि भारतातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोफायनान्स संस्थेने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केले आहे.

मुथ्थुट मायक्रोफिन लिमिटेड ही एकूण कर्जाच्या बाबतीत ३१ डिसेंबर २०२२ रोजी (स्त्रोत – क्रिसिल अहवाल) देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी एनबीएफसी- एमएफआय कंपनी आहे. त्याशिवाय कंपनी एकूण कर्ज पोर्टफोलिओच्या बाबतीत दक्षिण भारतातील सर्वात मोठी असलेली तिसऱ्या क्रमांकाची एनबीएफसी- एमएफआयएमएफआय मार्केटशेयरच्या बाबतीत केरळमधील सर्वात मोठीतर १६ टक्के हिश्श्यासह ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत (स्त्रोत – क्रिसिल अहवाल) तमिळनाडू येथील महत्त्वाची कंपनी आहे.

कंपनीने आयपीओद्वारे निधी उभारण्याचे ठरवले आहे. रू. १० दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेयर्सच्या विक्रीतून एकूण १३५० कोटी रुपयांची रक्कम उभारली जाणार आहे (द ऑफर). त्यामध्ये कंपनीतर्फे ९५० कोटी रुपये किंमतीचे इक्विटी शेयर्स (द फ्रेश इश्यू) आणि ४०० कोटी रुपये किंमतीच्या भागधारकांच्या शेयर्सचा विक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) यांचा समावेश आहे.

इक्विटी शेयर्सच्या विक्री प्रस्तावामध्ये थॉसम जॉन मुथ्थुट यांचे रू. ७० कोटी शेयर्स, थॉमस मुथ्थुट यांचे रू. ७० कोटी शेयर्स, थॉमस जॉर्ज मुथ्थुट यांचे रू. ७० कोटी शेयर्स, प्रीती जॉन मुथ्थुट यांचे रू. ३० कोटी किंमतीचे शेयर्स, रेमी थॉमस यांचे रू. ३० कोटी किंमतीचे शेयर्स आणि निना जॉर्ज यांचे ३० कोटी रुपये किंमतीचे शेयर्स (एकत्रितपणे प्रमोटर सेलिंग शेयरहोल्डर्स), ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल WIV Ltd चे एकूण १०० कोटी रुपये किंमतीचे शेयर्स (इन्व्हेस्टर सेलिंग शेयरहोल्डर्स) आणि सेलिंग शेयरहोल्डर्सतर्फे उपलब्ध केले जात असलेले अशाप्रकारचे इक्विटी शेयर्स (ऑफर फॉर सेल आणि एकत्रितपणे नवी विक्री, ऑफरसह) यांचा समावेश आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेडजेएम फायनान्शियल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या विक्रीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.