पुणे : “मुक्ताबाई, ते शांताबाई” यांच्या कविता आणि गीतांची पर्वणी पुणेकरांना अनुभवता येणार आहे. कवयित्रींच्या कवितांचा आणि गीतांचा पट उलगडून दाखवणारा कार्यक्रमाचे आयोजन येत्या शुक्रवारी २७ जानेवारी २०२३ रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे या ठिकाणी केले आहे. अशी माहिती प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी दिली.
कुलकर्णी म्हणाल्या, की संत मुक्ताबाई, संत जनाबाई, बहिणाबाई, पद्मा गोळे, इंदिरा संत, शांता शेळके अश्या अनेकांनी केवळ अप्रतिम कविताच लिहिल्या नाहीत तर त्या त्या काळातील स्थितीवर भाष्य केले. विचार मांडले, विचार करायला लावले. त्या पुढे म्हणाल्या की या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैभव जोशी, प्रमुख उपस्थिती डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. संगीता बर्वे, अंजली कुलकर्णी हे असणार आहेत.
तर संकल्पना व निवेदन ऋता थत्ते, गायक सारंग पाडळकर, गायिका मधुरा – घैसास, बेहेरे आणि श्रुती जोशी विशेष सहभाग मृणालिनी कानिटकर – जोशी, वादक – प्रसन्न बाम संवादिनी, ओंकार पाटणकर – सिन्थेसायझर – अभय इंगळे, वेस्टर्न हिदम – अमित कुंटे – तबला अशा आदींचा सहभाग असणार आहे. सदरील कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असून जास्तीतजास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन माजी आमदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केले आहे.